मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ऐकावं ते नवलच..! लग्नात सप्तपदी घेता-घेताच नवरा-नवरी खेळायला लागले गेम, VIDEO व्हायरल

ऐकावं ते नवलच..! लग्नात सप्तपदी घेता-घेताच नवरा-नवरी खेळायला लागले गेम, VIDEO व्हायरल

लग्नाचे विधी (Hindu Marriage) बराच वेळ सुरू असतात, तेव्हा लोक उभ्या-उभ्या कंटाळतात. नवरा-नवरीही कंटाळून जातात. अशाच एका नवरा-नवरीनं स्वतःच्या लग्नात कंटाळा घालवण्यासाठी लग्नाचे विधी सुरू असतानाच एक गेम खेळण्यास सुरुवात केली.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 31 मे : हिंदू धर्मातील लग्नांमध्ये सप्तपदी हा महत्त्वाचा विधी असतो अग्नीभोवती सात प्रदक्षिणा घालत पती-पत्नी एकमेकांना सात वचनं देतात. ते दोघं ती वचनं आयुष्यभर निभावतात. या वेळी लग्नासाठी उपस्थित असलेले लोक नवरा-नवरीवर पुष्पवर्षाव करतात. अनेकदा लग्नाचे विधी (Hindu Marriage) बराच वेळ सुरू असतात, तेव्हा लोक उभ्या-उभ्या कंटाळतात. नवरा-नवरीही कंटाळून जातात. अशाच एका नवरा-नवरीनं स्वतःच्या लग्नात कंटाळा घालवण्यासाठी लग्नाचे विधी सुरू असतानाच एक गेम खेळण्यास सुरुवात केली. विधींच्या दरम्यान काही वेळ असताना नवरा-नवरी एकमेकांशी गप्पा मारत होते आणि बॉटल फ्लिप हा गेमही खेळत होते. कंटाळा आणणारा वेळ हसत-खेळत घालवण्याचे त्यांचे प्रयत्न काही लोकांनी कॅमेऱ्यात कैद केले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नॉटी सोसायटी (Naughty Society) या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 'बस यही करना है' असा कॅप्शन याला दिला आहे. यावर इतरांनीही अनेक कमेंट्स केल्या आहेत. काहींनी गंमतशीस कमेंट्स दिल्या आहेत, तर काहींनी या दोघांनावर टीका करत विधींचा आदर करणं आपलं कर्तव्य आहे, असे त्यांना सांगितलं आहे.
एका इंस्टाग्राम यूजरनं हा व्हिडिओ पाहून 'मैं तो चिडिया उड खेलूंगी' असे लिहिले आहे. तर, आणखी एका युजरने लग्नामध्ये हा नवा विधी तर समाविष्ट झाला नाही ना, असा खोडकर प्रश्न केला आहे. तर काहींनी आपल्या प्रथा योग्यपणे जपणं गरजेचं आहे असे म्हटले आहे. ज्यांना विधींचा कंटाळा येतो तर त्यांनी अशा विधी न करताही लग्न करायला काय हरकत आहे, असे म्हटले आहे. अनेकांना आपले लग्न सर्वांच्या लक्षात राहावे असं वाटत असतं त्यासाठी मग काही उत्साही नवरा-नवरी काही आयडिया वापरून नवीन काहीतरी करत असतात. यामुळं लोकांचीही करमणूक होते आणि लग्न काहीसं हटके होतं असं लोकांनाही वाटते.
First published:

Tags: Marriage, Social media viral, Video viral

पुढील बातम्या