Home /News /viral /

मागवले ऑनलाइन कपडे; बॉक्समधून आल्या जिवंत अळ्या; संतापलेल्या ग्राहकाने शेअर केला VIDEO

मागवले ऑनलाइन कपडे; बॉक्समधून आल्या जिवंत अळ्या; संतापलेल्या ग्राहकाने शेअर केला VIDEO

न्यूयॉर्कमधील एका व्यक्तीला मिळालेली डिलीव्हरी पाहून त्याला धक्काच बसला.

    न्यूयॉर्क, 25 ऑगस्ट : एखादी वस्तू ऑनलाइन ऑर्डर (online shopping) केल्यानंतर चुकीची वस्तू  किंवा खराब वस्तू मिळणं तसं काही नवं नाही. शिवाय एखादी वस्तू आपण ऑनलाइन जशी पाहतो त्यापेक्षा कितीतरी वेगळी असते. त्यावेळी आपण मागवलेली हीच वस्तू आहे याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. मात्र न्यूयॉर्कमधील (new york) एका व्यक्तीला मिळालेली डिलीव्हरी पाहून त्याला धक्काच बसला. बेन स्मिथी (Ben Smithee) असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याने ऑनलाइन कपडे ऑर्डर केले होते. त्याची डिलीव्हरी त्याच्या घरी झाली. घरी डिलीव्हरी बॉक्स येताच त्याने तो खोलला अन् पाहतो तर काय कपड्यांसह डझनभर अळ्या त्या बॉक्समध्ये होत्या.या अळ्या जिवंत होत्या, कपड्यांवर फिरत होत्या. बेन स्मिथीने आपल्या फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. बेन म्हणाला, "मी काही कपडे ऑनलाइन ऑर्डर केले होते. 20 ऑगस्टला मला डिलीव्हरी मिळाली. मी जसं हा बॉक्स खोलला तेव्हा त्यात डझनभर जिवंत अळ्या होत्या. कपड्यांवर या अळ्या फिरत होत्या. जवळपास 25 ते 30 अळ्या असतील." हे वाचा - बापरे! एसीतून हवा नाही तर आला साप...अन् केली उंदाची शिकार, पाहा थरारक VIDEO स्मिथी पुढे म्हणाला, "हा बॉक्स पूर्णपणे बंद होता. तो कुठूनही खुली नव्हता. त्यामुळे शीपिंगदरम्यान तरी यामध्ये अळ्या जाण्याची शक्यता नाही. या बॉक्समध्ये तीन वस्तू प्लॅस्टिकच्या पॅकेटमध्ये होत्या. त्या सर्वांवर या अळ्या होत्या. मी संबंधित कंपनीकडे याची तक्रार केली त्यांनी माफी मागितली आणि हे कपडे बदलून दुसरे कपडे देण्याची किंवा पैसे परत करण्याची तयारी दर्शवली" हे वाचा - पाण्याबाहेर तडफडणाऱ्या माशासाठी छोट्याशा डुकरांची धडपड; हृदयस्पर्शी VIDEO VIRAL "कोरोनाच्या परिस्थितीमुळे पॅकेज परत करण्यासाठी पोस्टमध्ये मी जाऊन शकत नव्हतो. शिवाय कपड्यांवर अळ्या दिसताच त्या बाजूला काढून कपडे लगेच धुवून टाकले", असं स्मिथीने सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Social media viral, Viral videos

    पुढील बातम्या