मराठी बातम्या /बातम्या /Viral /

6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा VIDEO

6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा VIDEO

या चिमुरड्याचं मोठं कौतुक होत आहे

या चिमुरड्याचं मोठं कौतुक होत आहे

या चिमुरड्याचं मोठं कौतुक होत आहे

  • Published by:  Meenal Gangurde
वॉशिंग्टन, 22 सप्टेंबर : अमेरिकेतील (US state) उटाह (Utah) येथे सहा महिन्याच्या एका मुलाने विश्व रिकॉर्ड (World Record) तोडला आहे. आणि सर्वात कमी वयाच्या वॉटर स्कींग करणारा व्यक्ती (Youngest Person Ever To Go Water Skiing) ठरला आहे. सोशल मीडिया (Social Media) वर हा व्हिडीओ जलद गतीने व्हायरल (Viral Video) होत आहे. लेक पॉवेलमध्ये रिच हम्फ्रीज़ वॉटर स्कींग दाखवित आहे. जे पाहून इंटरनेटवर मोठी चर्चा सुरू आहे. समाचार वेबसाइट यूपीआयच्या रिपोर्टनुसार हा व्हिडीओ सर्वात पहिल्यांदा बाळाचे आई-वडील, केसी आणि मिंडी हम्फ्रीजने इंन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. हा अकाऊंट बाळाच्या आई-वडिलांच्या नावावर आहे. हा व्हिडीओ त्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक लहानग्याने बोटीला कनेक्टेड आयरन रॉडला गच्च पकडले आहे. तर दुसरीकडे त्याचे वडील दुसऱ्या बोटीवर आहेत आणि बाळाला पाहत आहेत. बाळाने लाइफ जॅकेटही घातलं आहे.
View this post on Instagram

I went water skiing for my 6 month birthday. Apparently that’s a big deal… #worldrecord

A post shared by Rich Casey Humpherys (@richcaseyhumpherys) on

संपूर्ण सुरक्षेसह बाळ पाण्यात उतरल्याचे दिसत आहे. व्हिडीओ शेअर करीत त्याच्या आई-वडिलांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मी आपल्या 6 महिन्याच्या महिन्याच्या वाढदिवशी वॉटर स्किंग करायला गेला. ही खूप मोठी गोष्ट आहे कारण हे मोठं काम आहे. हा व्हिडीओ 13 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आला होता. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पसंत केला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवरही शेअर करण्यात आला असून तेथे आतापर्यंत 7.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर मात्र यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जणं म्हणाले की वॉटर स्किंग करण्यासाठी त्याचं वय खूप कमी आहे. तर काहींनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. एबीसी न्यूजनुसार अनधिकृत विश्व रेकॉर्ड ऑबर्न अब्शर याने केला होता. तो 6 महिने आणि 10 दिवसांचा होता.

First published:

Tags: Small baby

पुढील बातम्या