• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • तरुणीचा कार पार्किंगचा अनोखा अंदाज; VIDEO पाहून पोट धरून हसाल

तरुणीचा कार पार्किंगचा अनोखा अंदाज; VIDEO पाहून पोट धरून हसाल

एक महिला कारमध्ये बसलेली दिसते. ती अगदी अनोख्या अंदाजात कार पार्क करते. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली 19 नोव्हेंबर : सोशल मीडिया (Social Media) एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर सतत काही ना काही नवीन पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ असे असतात जे अपलोड होताच व्हायरल (Viral Videos) होतात. काही लोक आपल्या डोक्याचा वापर करून अशा शक्कल लढवतात की त्यांच्या टॅलेंटचे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या भलतेच पसंतीस उतरतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक महिला कारमध्ये बसलेली दिसते. ती अगदी अनोख्या अंदाजात कार पार्क करते. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक महिला आपल्या कारमध्ये बसलेली आहे. काही वेळातच ती आपली कार पार्क करते. व्हिडिओमध्ये दिसतं की कार पार्क करण्यासाठी ती कारच्या सीटमधून हळूहळू आपला पाय मागे टाकते. काही वेळातच तिचा पाय गाडीच्या डिक्कीमधून बाहेर येताना दिसतो. यानंतर ती पाय गाडीच्या थोडा बाहेर काढून पार्क करताना गाडी धडकू नये याची काळजी घेते. यामुळे गाडीचा मागचा भाग भिंतीला धडक्याआधीच तिचा पाय तिथे लागतो आणि एकदम व्यवस्थित ती गाडी पार्क करते.
  View this post on Instagram

  A post shared by hepgul5 (@hepgul5)

  हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ hepgul5 नावाच्या पेजवर पाहू शकता. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत असून अनेकांनी इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर केला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, हा व्हिडिओ खरंच फार अजब आहे. आणखी एका यूजरनं लिहिलं ही पद्धत सोपी आहे पण असं कोण करतं? तिसऱ्या यूजरनं लिहिलं, अतिशय अजब आहे, कोणाचा पाय असा बाहेर जाऊ शकतो? य़ाशिवायही अनेकांनी व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: