जन्म घेताना रडण्याआधीच रागवलं नवजात शिशु? सोशल मीडियावर PHOTO VIRAL

सोशल मीडियावर या नवजात बाळाच्या हावभावांची तुफान चर्चा होत आहे. यासोबतच त्याच्या हावभावावरून मीम्सही तयार केले जात आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : नवजात बालकांचा जन्म झाला की ते रडायला लगतात मात्र आज आपण अशा एका चिमुकल्याला भेटणार आहोत ज्याने आयुष्याची सुरुवातच रागवण्यानं केली आहे. रडण्याआधी त्याने राग व्यक्त केला त्यामुळे या नवजात बालकाची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. 13 फेब्रुवारी रोजी ब्राझीलमध्ये जन्माला आलेल्या या बाळाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव. हे हावभाव पाहून डॉक्टर आणि सोशल मीडियावरील युझर्सही चकीत झाले. जन्माला आलेलं नवजात बालक रडण्याऐवजी रागानं पाहात होतं. ह्या बालकाचा जन्म ब्राझीलमध्ये झाला आहे. रिओ डी जनेरे इथे डायने डी येसूस बार्बोसा यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिची प्रकृती ठिक आहे का? हे तपासण्यासाठी डॉक्टरांनी तिला थोपटलं मात्र ती मुलगी रडण्याऐवजी रागानं डॉक्टरांकडे पाहू लागली. त्यावर डॉक्टरही अचंबित झाले. बाळ का रडत नाही हा प्रश्न त्यांना पडला. मात्र या नवजात बालिकेच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून काही सेकंद त्यांना हसूही आलं.

सोशल मीडियावर ही नवजात बालिका मीम्सचा विषय बनली आहे. तर या हावाभावानं जनभरातून तुफान लाईक्स आल्या आहेत. असं घडण्यामागचं कारण ही तितकचं भन्नाट आहे. डॉक्टरांनी या नवजात बालिकेची नाळ न कापता तिला रडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हा प्रसंग घडला. त्यानंतर नाळ कापल्यावर बालिका रडायला लागली. हे कारण नवजात बालिकेच्या आईनंच सांगितलं आहे. या चिमुकलीच्या आईनं हे सुंदर क्षण टिपण्यासाठी खास फोटोग्राफर ठेवला होता. त्याने आपल्या कॅमेऱ्यात हे अनोखं दृश्य टिपलं आहे. या फोटोची जगभरात आणि सोशल मीडियावरही तुफान चर्चा होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2020 02:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading