टोकियो, 22 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. याचबरोबर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) देखील विविध रेकॉर्डचे व्हिडीओ अपलोड करत असतात. विविध प्रकारच्या या रेकॉर्डच्या काही व्हिडीओवर विश्वास ठेवणे अवघड होते. डोळे विस्फारून टाकणाऱ्या अशा काही व्हिडिओमध्ये खूपच अविश्वसनीय वर्ल्ड रेकॉर्ड केलेले असतात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Records) त्यांच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर एक उड्या मारण्याचा व्हिडीओ अपलोड केला असून यामध्ये करण्यात आलेल्या कारनाम्यावर विश्वास ठेवणे कठीण होते.
जपानमधील 14 शालेय विद्यार्थ्यांचा दोरीच्या उड्या (Rope Skipping) मारतानाचा हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो जबरदस्त व्हायरल होत आहे. जपानच्या शिजीओका मधील फुजी येथील 14 विद्यार्थ्यांनी 8 सप्टेंबर 2017 मध्ये हा रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये 12 विद्यार्थी उड्या मारत असून 2 जणांनी दोरी धरली आहे. एका मिनिटामध्ये 230 दोरीच्या उड्या मारण्याचा रेकॉर्ड त्यांनी केला आहे. पण या व्हिडीओमध्ये ज्या पद्धतीने उड्या मारत आहेत, ते पाहून ही मुले हवेत तरंगत असल्याचा भास होतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आतापर्यंत याला हजारोंनी लाईक्स मिळाल्या असून विविध प्रतिक्रिया देखील मिळत आहेत.जपानमधील इबाराकीच्या टोराइड येथील स्थानिक वेलोड्रोममध्ये हा रेकॉर्ड नोंदवण्यात आला. यामध्ये तीन महिलांच्या ग्रुपने 30 सेकंदात 129 उड्या मारण्याचा रेकॉर्ड केला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Records) दिलेल्या माहितीनुसार, अयुमी साकामाकी (Ayumi Sakamaki) या इतक्या वेगाने दोरीवर उड्या मारत होत्या की, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निरीक्षक कौरु इशिकावा यांना या रेकॉर्डचे स्लो मोशनमध्ये पाहून उड्या मोजाव्या लागल्या. मागील काही दिवसांपासून त्या आणि त्यांची टीम हा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची इच्छा होती. परंतु आता त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाल्याचे त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डबरोबर बोलताना म्हटले. याचबरोबर आमच्या या रेकॉर्डने इतरांना प्रेरणा मिळणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Japan, Social media viral, World record