Home /News /viral /

आइस्क्रीममध्ये इसबगोल? 'अमूल Isabcool' फ्लेव्हर पाहून सोशल मीडियावर रंगल्या भलत्याच चर्चा

आइस्क्रीममध्ये इसबगोल? 'अमूल Isabcool' फ्लेव्हर पाहून सोशल मीडियावर रंगल्या भलत्याच चर्चा

अमूलने नुकताच Isabcool नावाचा आइस्क्रीमचा एक नवीन फ्लेव्हर मार्केटमध्ये लाँच केला आहे. या फ्लेव्हरमध्ये इसबगोल असल्याचं नेटिझन्सचं म्हणणं आहे. इसबगोल (Isabgol) हे रेचक म्हणजेच पोट साफ होण्याचं आयुर्वेदिक औषध आहे

नवी दिल्ली 16 मे : उन्हाळ्यात आइस्क्रीम (Ice Cream) म्हणजे अगदी जीव की प्राण असतं. तुम्हीही आइस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेव्हर्स खाल्ले असतील. तुमच्या आवडीचे काही फ्लेव्हर असतील, जे तुम्हाला इतर फ्लेव्हरपेक्षा जास्त आवडत असतील. आइस्क्रीम कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन फ्लेव्हर्स आणत असतात. काही फ्लेव्हर्सची तर नावं ऐकूनही ग्राहकांना धक्का बसतो. आता आइस्क्रीमचा असाच एक फ्लेव्हर (Ice Cream Flavor) अमूलने आणला आहे आणि या फ्लेव्हरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. अमूलने नुकताच Isabcool नावाचा आइस्क्रीमचा एक नवीन फ्लेव्हर मार्केटमध्ये लाँच केला आहे. या फ्लेव्हरमध्ये इसबगोल असल्याचं नेटिझन्सचं म्हणणं आहे. इसबगोल (Isabgol) हे रेचक म्हणजेच पोट साफ होण्याचं आयुर्वेदिक औषध आहे. इसबगोल हे भारतातल्या अनेक घरांमध्ये वापरलं जाणारं रेचक आहे. एका ट्विटर युजरने अमूलच्या या रेचकयुक्त आइस्क्रीमच्या जाहिरातीची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. डेझर्ट आणि रेचक यांच्या या अनोख्या मिश्रणाने बनवलेलं आइस्क्रीम पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. Shocking! तो घास तोंडात घेणार तोच...; 'मसालेदार चिली'तून शीर नसलेल्या बेडकाने मारली उडी ही जाहिरात पाहिल्यावर नेटिझन्स भन्नाट कमेंट्स करत आहेत. काहींनी हे आइ्सक्रीम तिशीतल्या व्यक्तींसाठी असल्याचं म्हटलं आहे. काहींनी हे आइस्क्रीम अमूल फार्मसीत विकणार नाही अशी आशा असल्याचं म्हटलं आहे. या पोस्टवर नेटिझन्स भन्नाट प्रतिक्रिया देत असून, आता हेच बघायचं राहिलं होतं, असं म्हणत काही जणांनी अमूलला खोचक टोलेही लगावले आहेत. इसबगोल काय आहे? इसबगोल हे सायलियम हस्क (Psyllium Husk) आहे आणि वजन कमी करण्यातही मदत करू शकतं, असं हेल्थलाइनवरची माहिती सांगते. इसबगोल हे प्लांटागो ओवाटा (Plantago ovata) नावाच्या वनस्पतीचं बीज आहे. इसबगोलच्या पावडरमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात आणि आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असतं. इसबगोलची लागवड भारतासह जगातल्या बर्‍याच देशांमध्ये केली जाते. Drinks For Weight Loss: पोट कमी करण्याचा निश्चय केलाय? मग या 5 ड्रिंक्स नक्की घ्यायला सुरू करा इसबगोलचे फायदे इसबगोल वजन कमी करण्यास फायदेशीर आहे. सध्या धकाधकीच्या जीवनात दर तीनपैकी एक व्यक्ती लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. अशा व्यक्तींना वजन कमी करण्यास इसबगोल मदत करू शकतं. इसबगोल घेतल्याने पोट चांगल्या प्रकारे साफ होतं आणि वजन कमी करण्यास मदत होते. इसबगोलमध्ये कोलेस्टरॉल नसतं आणि फायबर्सचं प्रमाण जास्त असतं. संशोधन असं सांगतं, की आपल्या आहारात इसबगोलसारख्या फायबर-समृद्ध पदार्थांचा समावेश केल्याने हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. हे रक्तदाब कमी करण्यास, लिपिडची पातळी वाढविण्यात आणि हृदयाच्या स्नायूंना बळकट करण्यात मदत करतं. म्हणूनच इसबगोल हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. दरम्यान, अनेक प्रकारे उपयुक्त असलेल्या या इसबगोलच्या फ्लेव्हरचं आइस्क्रीम अमूलने आणल्याची चर्चा बरीच रंगली आहे.
First published:

Tags: Food, Viral news

पुढील बातम्या