Home /News /viral /

...आणि दुर्गा अवतरली! अपहरण करणासाठी आलेल्या अज्ञातांना महिलेनं धू-धू धुतलं, पाहा VIDEO

...आणि दुर्गा अवतरली! अपहरण करणासाठी आलेल्या अज्ञातांना महिलेनं धू-धू धुतलं, पाहा VIDEO

अपहरण करण्यासाठी आलेल्या अज्ञात आरोपींना महिलेनं दिला चोप, स्थानिकांनी मात्र घेतली बघ्याची भूमिका.

    धौलपूर, (राजस्थान) 19 ऑक्टोबर : देशभरात नवरात्र उत्सव सुरू आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक दुर्गा दडलेली असते. माणसातल्या वाईट राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी अशीच एक दुर्गा रस्त्यावर अवतरल्याचं पाहायला मिळालं. विवाहित महिलेचं अपहरण करणाऱ्यांना दुर्गा मातेचं रुप धारण करत तिने धडा शिकवला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोलीस ठाण्याजवळच असलेल्या या महिलेचं अपहरण करण्याचा डाव काही अज्ञातांचा होता. मात्र हा डाव महिलेनं धाडस दाखवून हाणून पाडला आहे. तर उपस्थितांनी केवळ बघ्याची भूमिका घेत व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. मिळालेल्या माहितीनुसार ही 30 वर्षांच्या या तरुणीचं नाव भूरी पुत्री भभूती गुर्जर आहे. 12 वर्षांपूर्वी भूरीचं साहेबसिंगबरोबर जगनेर शहरातील रघुआ गावात लग्न झालं होतं. पण या पतीचे त्याच्या वहिनीसोबत अवैध संबंध असल्याचे आरोप करत भूरीने सासर सोडलं होतं. ही महिला वडिलांनी दिलेल्या घरात राहून एका नर्सिंग होममध्ये मोठ्या हिमतीनं काम करण्यास सुरुवात केली. हे वाचा- बाप रे! महिला पडली चक्क 'भुताच्या' प्रेमात, फसवणूक झाल्यानंतर करायचंय ब्रेकअप रविवारी सकाळी घरातून निघाल्यानंतर काही जण कारमधून तिचा पाठलाग करत असल्याचा आरोप या महिलेनं केला. या कारमधल्या दोन लोकांनी जबरदस्ती मला गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित असलेल्या एकाही तरुणानं माझी मदत केली नाही. तिने स्वत:च धाडस दाखवून या अपहरण करणाऱ्या युवकांविरोधात लढायला सुरुवात केली. जवळपास 10 ते 15 मिनिटं भररस्त्यात हा प्रकार सुरू होता. ई-मित्र मंडळ या महिलेला वाचवण्यासाठी पुढे आलं आणि त्यांनी मिळून या अज्ञातांना पिटाळून लावलं आहे. अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान ही घटना राजस्थानच्या धौलपूर परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे. महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ आणि महिलेच्या जबाबावरून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
    First published:

    पुढील बातम्या