नाशिक, 04 ऑगस्ट : जगभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून कर्तृव्य पार पाडत आहे. डॉक्टरांचं सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे. पण, नाशिकमध्ये डॉक्टरावर हात उचलण्याची शरमेची घटना घडली आहे.
नाशिकमधील सिडकोच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
सिडकोतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कोविड-19 संशयित रुग्णाचा 3 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातलगांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घटनेची वाच्यता झाली.
नातेवाईकांनी डॉक्टरच्या केबिनमध्ये गेले आणि रिपोर्ट दाखवत आपल्या रुग्णाचा मृत्यू का झाला याची विचारणा केली. डॉक्टर नेमके कारण हे समजावून सांगत होते. पण, ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण सुरू केली.
पुणेकरांनो, काळजी घ्या! नायडू हॉस्पिटलमध्ये घडला धक्कादायक प्रकार
घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंबड पोलीस याप्रकरणी चौकशी सुरू केली. पोलिसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यानंतर आज अंबड पोलीस ठाण्यात 3 आरोपींवर महाराष्ट्र वैद्यकीय सेवा अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेचा आयएमएने निषेध केला असून संबंधित नातलगांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.