जगातले सगळे समुद्र सुकले तर...! NASAने शेअर केले भीतीदायक फोटो

जगातले सगळे समुद्र सुकले तर...! NASAने शेअर केले भीतीदायक फोटो

फक्त पाच फोटोंमध्ये नासाने दाखवले येत्या काही वर्षात पृथ्वीचे काय होणार! हे भयंकर फोटो एकदा पाहाच.

  • Share this:

पृथ्वीचा 70% भाग हा समुद्रांनी वेढलेला आहे. फक्त 30% भाग ही जमीन आहे, जिथे माणूस राहतो. आपण ग्लोबल वार्मिंगमुळे समुद्राची पातळी वाढत आहे अशा बातम्या वाचतो. पण जर पृथ्वीवरील सर्व समुद्र सुकले तर? याचा कधी विचार केला आहे? याच संदर्भात नासाने (NASA) एक भीतीदायक व्हिडीओ शेअर केला आहे. (फोटो-नासा)

पृथ्वीचा 70% भाग हा समुद्रांनी वेढलेला आहे. फक्त 30% भाग ही जमीन आहे, जिथे माणूस राहतो. आपण ग्लोबल वार्मिंगमुळे समुद्राची पातळी वाढत आहे अशा बातम्या वाचतो. पण जर पृथ्वीवरील सर्व समुद्र सुकले तर? याचा कधी विचार केला आहे? याच संदर्भात नासाने (NASA) एक भीतीदायक व्हिडीओ शेअर केला आहे. (फोटो-नासा)

अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने नुकतेच काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. या चित्रांमध्ये असे दर्शविले गेले आहे की जर पृथ्वीवरील संपूर्ण महासागर कोरडे पडेल तर, पृथ्वी कशी दिसेल. ही चित्रे अत्यंत भयावह आहेत. कारण प्रत्येक चित्रात, पृथ्वी वाळवंट होताना दिसत आहे.

अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने नुकतेच काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. या चित्रांमध्ये असे दर्शविले गेले आहे की जर पृथ्वीवरील संपूर्ण महासागर कोरडे पडेल तर, पृथ्वी कशी दिसेल. ही चित्रे अत्यंत भयावह आहेत. कारण प्रत्येक चित्रात, पृथ्वी वाळवंट होताना दिसत आहे.

प्रथम चित्र: जेव्हा समुद्राचे पाणी सामान्य पातळीवर असते  या चित्रात आपल्याला सर्व देशांच्या चहूबाजुला समुद्र दिसतील. म्हणजेच समुद्राच्या पाण्याची पातळी कमी झालेली नाही. हे आपल्या पृथ्वीच्या सद्य स्थितीचे चित्र आहे.

प्रथम चित्र: जेव्हा समुद्राचे पाणी सामान्य पातळीवर असते
या चित्रात आपल्याला सर्व देशांच्या चहूबाजुला समुद्र दिसतील. म्हणजेच समुद्राच्या पाण्याची पातळी कमी झालेली नाही. हे आपल्या पृथ्वीच्या सद्य स्थितीचे चित्र आहे.

दुसरा फोटो: जेव्हा पाण्याची पातळी 130 मीटर खाली जाईल तेव्हा या चित्रामध्ये आपल्याला उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, सायबेरिया या देशांच्यावर तपकिरी रंगात जमीन दिसत आहे. तर, युरोपच्या पूर्वेस, मध्य-पूर्व आशिया, चीन, जपान, मलेशिया इत्यादी भागात हलकी तपकिरी जमीन दिसू लागेल.

दुसरा फोटो: जेव्हा पाण्याची पातळी 130 मीटर खाली जाईल तेव्हा
या चित्रामध्ये आपल्याला उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, सायबेरिया या देशांच्यावर तपकिरी रंगात जमीन दिसत आहे. तर, युरोपच्या पूर्वेस, मध्य-पूर्व आशिया, चीन, जपान, मलेशिया इत्यादी भागात हलकी तपकिरी जमीन दिसू लागेल.

तिसरे चित्र: जेव्हा पाणी 550 मीटर खाली जाईल तेव्हा या चित्रात आपल्याला हे स्पष्टपणे दिसून येईल की सर्व खंड, उपखंडातील सगळ्यात जास्त भाग हा राखाडी क्षेत्र असेल. म्हणजे कोरड्या जमिनीचे क्षेत्र वाढेल. पाण्याची पातळी जवळ जवळ 550 मीटर खाली जाईल. रशिया, सायबेरिया, ग्रीनलँड. अंटार्क्टिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका, मध्य-पूर्व देश आणि ऑस्ट्रेलिया सर्वत्र पसरलेले महासागर जमिनीपासून दूर जाऊ लागतील.

तिसरे चित्र: जेव्हा पाणी 550 मीटर खाली जाईल तेव्हा
या चित्रात आपल्याला हे स्पष्टपणे दिसून येईल की सर्व खंड, उपखंडातील सगळ्यात जास्त भाग हा राखाडी क्षेत्र असेल. म्हणजे कोरड्या जमिनीचे क्षेत्र वाढेल. पाण्याची पातळी जवळ जवळ 550 मीटर खाली जाईल. रशिया, सायबेरिया, ग्रीनलँड. अंटार्क्टिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका, मध्य-पूर्व देश आणि ऑस्ट्रेलिया सर्वत्र पसरलेले महासागर जमिनीपासून दूर जाऊ लागतील.

चौथे चित्र: पृथ्वी पुर्णत: वाळवंट होईल  चौथ्या चित्रात, आपण पृथ्वी एक वाळवंट होत असल्याचे भयानक चित्र पाहू शकता. या चित्रात, वाळवंटांनी वेढलेले खंड दर्शविले आहेत. मध्यभागी दिसणारा काळ्या रंगाचा भाग हा खोल गेलेला समुद्र दर्शवत आहे. या चित्रात समुद्राचे पाणी 4550 मीटर खाली गेले आहे, असे दाखवण्यात आले आहे.

चौथे चित्र: पृथ्वी पुर्णत: वाळवंट होईल
चौथ्या चित्रात, आपण पृथ्वी एक वाळवंट होत असल्याचे भयानक चित्र पाहू शकता. या चित्रात, वाळवंटांनी वेढलेले खंड दर्शविले आहेत. मध्यभागी दिसणारा काळ्या रंगाचा भाग हा खोल गेलेला समुद्र दर्शवत आहे. या चित्रात समुद्राचे पाणी 4550 मीटर खाली गेले आहे, असे दाखवण्यात आले आहे.

पाचवे चित्र: 10040 मीटर पाण्याखाली, म्हणजेच समुद्र गायब या चित्रात नासाने पृथ्वीवरील सर्व समुद्र कोरडे झाल्याचे स्पष्टपणे दर्शविले आहे. वाळवंट सर्व खंडातून व्यापलेले आहे. म्हणजेच आपल्या पृथ्वीवरील समुद्रात सापडलेले सर्व प्राणी नष्ट झाले आहेत. समुद्रामार्गे व्यापार संपला. येथे फक्त वाळवंट आणि वाळू शिल्लक आहे.

पाचवे चित्र: 10040 मीटर पाण्याखाली, म्हणजेच समुद्र गायब
या चित्रात नासाने पृथ्वीवरील सर्व समुद्र कोरडे झाल्याचे स्पष्टपणे दर्शविले आहे. वाळवंट सर्व खंडातून व्यापलेले आहे. म्हणजेच आपल्या पृथ्वीवरील समुद्रात सापडलेले सर्व प्राणी नष्ट झाले आहेत. समुद्रामार्गे व्यापार संपला. येथे फक्त वाळवंट आणि वाळू शिल्लक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Earthnasa
First Published: Feb 7, 2020 10:09 PM IST

ताज्या बातम्या