मराठी बातम्या /बातम्या /Viral /कळसुबाई शिखरावर ठेवलं चिमुकलीचं नाव; गिर्यारोहक दाम्पत्याचं थरारक पाऊल, पाहा Video

कळसुबाई शिखरावर ठेवलं चिमुकलीचं नाव; गिर्यारोहक दाम्पत्याचं थरारक पाऊल, पाहा Video

कळसुबाई शिखर

कळसुबाई शिखर

अनेक गिर्यारोहक असेही असतात ते समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण करतात. असंच एक गिर्यारोहक जोडपं चर्चेत आलं आहे. त्यांनी चक्क महाराष्ट्राच्या सर्वात उंच शिखरावर आपल्या चिमुकलीचा नामकरण सोहळा पार पाडला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

जालना, 7 फेब्रुवारी : अनेकांना आयुष्यात धाडसी, साहसी काहीतरी करण्याती इच्छा असते. अनेकजण उंच उंच शिखरांवर, गड किल्ल्यांवर, हिमालयासारख्या ठिकाणी ट्रेकला जाताना दिसतात. जगभरात अनेर गिर्यारोहक आहेत जे आपली ही आवड, छंद जोपासताना दिसतात. अनेक गिर्यारोहक असेही असतात ते समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण करतात. असंच एक गिर्यारोहक जोडपं चर्चेत आलं आहे. त्यांनी चक्क महाराष्ट्राच्या सर्वात उंच शिखरावर आपल्या चिमुकलीचा नामकरण सोहळा पार पाडला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्वात उंच असलेल्या शिखरावर आठ महिन्यांच्या चिमुकलीचा अनोखा नामकरण सोहळा पार पडलाय. विनोद सुरडकर हे जालना जिल्ह्यातील गिर्यारोहक आहेत. त्यांनी गिर्यारोहक असलेल्या सपना यांच्याशी किल्ले रायगडावर विवाह करत एक आदर्श ठेवला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. त्यामुळं स्त्री शक्तीचा जागर व्हावा आणि देशातील आदर्श स्त्रीयांचे संस्कार मुलीवर व्हावे या उद्देशानं त्यांनी कळसुबाई शिखरावर चिमुकलीच्या नामकरण करण्याचं ठरवलं.

2 फेब्रुवारीला सुरडकर दाम्पत्यांनी चिमुकलीसह कळसुबाई शिखर पार केला. 'वसुंधरा' असं या चिमुकलीचं नाव ठेवण्यात आलं. ड्रोन कॅमेरात या नामकरण सोहळ्याची दृश्य टिपण्यात आलीयेत. दरम्यान महाराष्टातल्या सर्वांत उंच कळसुबाई शिखरावर चिमुकलीचा नामकरण सोहळा करून या गिर्यारोहक सुरडकर दाम्पत्यांनी नवीन पिढीला अनोखा संदेश दिला आहे. सध्या या जोडप्याची सर्वत्र चर्चा होत असून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, स्त्री शक्तीचा जागर व्हावा आणि देशातील आदर्श स्त्रीयांचे संस्कार मुलीवर व्हावे, म्हणून गिर्यारोहक दाम्पत्यानं उचललं थरारक पाऊल उचललं आहे. 8 महिन्यांच्या चिमुकलीसह थेट गाठलं महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आणि तिथे ठेवलं नाव. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत असून व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

First published:

Tags: Aurangabad, Top trending, Video viral, Viral