Home /News /viral /

VIDEO : बापरे! बेडवर फणा काढून बसला होता साप, तरुणानं पाहिलं आणि...

VIDEO : बापरे! बेडवर फणा काढून बसला होता साप, तरुणानं पाहिलं आणि...

राजकुमार या तरुणाच्या घरात लहान मुलाच्या बेडवर हा नाग फणा काढून बसला होता.

    हरदोई, 25 जुलै: नाग किंवा साप म्हटलं की भल्या भल्यांचे पाय लटपटायला लागतात आणि अंगाला घाम फुटतो. एरवी आपण सापांना मारतो किंवा सर्पमित्राच्या हवाली करतो नाहीतर साप पाहून गोंध घातला जातो. मात्र आज अनोखा प्रकार पाहायला मिळाला, याचं कारणही तितकंच खास आहे. उत्तर प्रदेशातील कोतवाली देहात परिसरात एका घरात चक्क बेडवर फणा काढलेला कोबरा बसल्याचं तरुणानं पाहिलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली मात्र तरुणानं सापाला कोणतीही इजा न पोहोचवता त्याची पूजा केली. तर तिथे जमलेल्या काही तरुणांनी ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. बेडवर बसलेल्या या नागाचा पूजा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. राजकुमार या तरुणाच्या घरात लहान मुलाच्या बेडवर हा नाग फणा काढून बसला होता. नागाला पाहून घरातील नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. त्यांनी या संदर्भात आजूबाजूच्या लोकांना कल्पना दिली. राजकुमारनं शांतपणे या कोब्र्याची पूजा केली. याचं विशेष कारण म्हणजे आज नागपंचमी आहे. त्यानिमित्तानं सापाला इजा न पोहोचवता त्याचं पूजन केलं. शनिवारी देशभरात नागपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उंदरापासून धान्याचं संरक्षण करणाऱ्या सापाची पूजा करण्यात येते. शेतात येणाऱ्या धान्याची नासाडी उंदीर करत असतात अशावेळी त्यांना खाऊन शेतीचं संरक्षण साप करतो. त्यामुळे नागाची पूजा केली जाते. नागपंचमीला विशेष महत्त्व आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Uttar pradesh news, Viral video.

    पुढील बातम्या