मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मुस्लीम कुटुंबाने घरातच मंदिराची केली स्थापना; दररोज आरती आणि शंखनादाचा येतो आवाज

मुस्लीम कुटुंबाने घरातच मंदिराची केली स्थापना; दररोज आरती आणि शंखनादाचा येतो आवाज

त्यांच्या मंदिरात गणपती, श्रीकृष्ण आणि राम दरबाराच्या मूर्ती आहेत.

त्यांच्या मंदिरात गणपती, श्रीकृष्ण आणि राम दरबाराच्या मूर्ती आहेत.

त्यांच्या मंदिरात गणपती, श्रीकृष्ण आणि राम दरबाराच्या मूर्ती आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde
अलीगड, 31 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये (Uttar Pradesh) एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या घरात मंदिराची स्थापना केली आहे. (Muslim family builds temple at home) हे मुस्लीम कुटुंब दररोज देवाची पूजा करतात. कुटुंबाचं म्हणणं आहे की, त्यांनी मुलगा आजारी असताना देवाकडे नवस मागितला होता, मुलगा बरा झाल्यानंतर त्यांची देवाप्रती श्रद्धा वाढली. या मुस्लीम कुटुंबाने घरातच देवाचं मंदिर स्थापन केलं व पूजा करणे सुरू केलं. ही घटना देहली गेट भागातील शाहजमाल स्थित एडीए कॉलनीतील आहे. येथे आसिफ खान आपली पत्नी रुबी आणि मुलगा आसिफसोबत राहतो. काही दिवसांपूर्वी अचानक त्यांच्या मुलाची तब्येत बिघडली होती. त्यांनी त्याच्यावर बरेच उपचार केले. मात्र त्याची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. (Muslim family builds temple at home) मंदिरात देवाची मूर्ती त्यांनी मुलासाठी अनेक प्रयत्न केलं. याशिवाय त्यांनी एका मंदिरातही नवस मागितला. त्यानंतर काही दिवसात त्यांचा मुलगा बरा झाला. मुलगा बरा झाल्यामुळे कुटुंबात आनंद होता. त्यांनी घरात मंदिर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या मंदिरात राम दरबार, गणपती आणि कृष्णाची मूर्ती आहे. घरातून येतो आरतीचा आवाज हे मुस्लीम कुटुंबीय दररोज देवाची पूजा करतात. त्यांच्या घरातून नियमित आरतीचा, शंखाचा आवाज येतो. रूबी आसिफ खान यांनी सांगितलं की, ते भाजपमध्ये महावीरगंज मंडळाचे मंत्री आहेत. रूबी यांनी पुढे सांगितलं की, ही त्यांची आस्था आहे. त्यांचा देवावर अतूट विश्वास आहे. देवाच्या कृपेतून त्यांचा मुलगा आज बरा झाला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
First published:

पुढील बातम्या