मुंबई, 4 मार्च : आई-वडिलांसाठी सर्वात आव्हानात्मक काय असेल तर ते लहान बाळाचं नीट पालनपोषण करणं. त्यातही त्याला खाऊ-पिऊ घालणं हे मोठंच दिव्य असतं. कारण लहान बाळं काही बोलू शकत नाहीत. (Instagram viral video)
बाळाला कधी भूक लागली, कधी नाही, त्याला दूध किती प्यायचं आहे हे समजून घेणं रोज एक आव्हान असतं. काही बाळांना तर बाटलीनं दूध पिणं अजिबातच आवडत नाही. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. (Instagram creative video with small baby)
या व्हिडिओत दिसतं, की एका वडिलांनी आपल्या लहानशा मुलीला दूध पाजण्याची नवीच पद्धत शोधून काढली आहे. या व्हिडिओला संगीत निर्माता रूडी विलिंगम यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे, 'माझ्या मुलीचं वजन खूपच कमी आहे. त्यामुळं आम्ही तिला खाऊ घालण्यासाठी काही नव्या तंत्रांचा उपयोग करत आहोत.' (music producer Rudy Willingham video)
View this post on Instagram
ही व्हिडिओ क्लिप खूप व्हायरल होते आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 19हजार हून अधिक जणांनी लाईक केला आहे. सोबतच 342 लोकांनी त्यावर तऱ्हेतऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. (Rudy Willingham daughter video)
हेही वाचा सुनील शेट्टीचा मुलगा आहे डिट्टो बाबांसारखा! बाप-लेकाचे PHOTO सोशल मीडियावर VIRAL
या लहानशा व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, की विलिंगम आपल्या मुलीला एका डिव्हाईसद्वारे दूध पाजत आहेत. या डिव्हाईसचं नाव आहे बीअर बॉन्ग. हे डिव्हाईस एका प्लास्टिक ट्यूबचं बनलेलं आहे. याला एका बाऊलसारख्या गोष्टीनं जोडलं आहे, जिथं पेय टाकलं जातं. पेयाचा प्रवाह एका नळानं नियंत्रित केला जातो जो पाईपशी जोडलेला आहे.
हेही वाचा भन्नाट ऑफर! सोशल मीडियावर Selfie अपलोड करा आणि मोबाईल फोन मिळवा
रूडी विलिंगमनं एक सिलिकॉन निप्पल जोडून डिव्हाईस बनवलं आहे. यात फॉर्म्युला दूध टाकून पाजलं जात आहे. ही लहान मुलगीही या नव्या पद्धतीकडे आश्चर्यचकित होत पाहते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Small baby, Viral video.