मुंबई : मुंबईतील वरळी येथे सकाळी जॉगिंगला जात असताना वेगवान कारनं धडक दिल्यानं एका टेक फर्मच्या सीईओ राजलक्ष्मी विजय रामकृष्णन यांचा मृत्यू झाला. रविवारी (19 मार्च) सकाळी साडेसहा वाजता वरळी सीफेसवरील वरळी डेअरीजवळ ही दुर्दैवी घटना घडली. राजलक्ष्मी यांच्या धक्कादायक निधनाबद्दल शोक व्यक्त करताना सोशल मीडिया युजर्सनी राजलक्ष्मी यांची एक जुनी लिंक्डइन पोस्ट शोधून काढली आहे.
ही पोस्ट आणि त्यांच्या मृत्यूचा संबंध जोडून अनेकांनी राजलक्ष्मी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'रनिंग' हा राजलक्ष्मी यांचा फार जिव्हाळ्याचा विषय होता आणि रनिंग करतानाच त्यांचा मृत्यू झाला हे बघून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
चिमुकल्याला बसवून बाईक वळवत होती व्यक्ती, समोरुन भरधाव कार आली आणि...
राजलक्ष्मी यांची ही लिंक्डइन पोस्ट टाटा मुंबई मॅरेथॉन 2023 बद्दल आहे. या मॅरेथॉनमधील आपल्या सहभागाबद्दल राजलक्ष्मी यांनी तपशीलवार माहिती दिलेली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी रनर रोनाल्ड रुकच्या एका कोटचा उल्लेख केला आहे. "मी माझ्या आयुष्याचे दिवस वाढवण्यासाठी धावत नाही, मी माझ्या दिवसांमध्ये आयुष्याची भर घालण्यासाठी धावते," असं हे कोट आहे. "मी माझ्या दिवसांमध्ये आयुष्याची भर घातली आहे, मी माझ्या आयुष्यात मित्र जोडले आहेत. मी माझ्या कामात बूस्टर शॉट जोडला आहे. मी धावण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी सकाळी उठते," या ओळींसह राजलक्ष्मी यांनी आपल्या लिंक्डइन पोस्टचा शेवट केला आहे.
Oh God, this is incredibly tragic :( Her LinkedIn DP itself has a pic of her running - she seems to be so passionately into running. pic.twitter.com/EuS6SrsA8Q
— Karthik 🇮🇳 (@beastoftraal) March 20, 2023
अचानक झालेल्या अपघाती मृत्यूनंतर राजलक्ष्मी यांची पोस्ट आणखी मार्मिक वाटत आहे. विशेष म्हणजे, त्यांचं लिंक्डइन प्रोफाइल पिक्चरसुद्धा धावतानाचं आहे. सोशल मीडिया युजर्सनी ही लिंक्डइन पोस्ट रिपोस्ट करत राजलक्ष्मी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेकांनी भावनिक कमेंट्सही केल्या आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ड्रायव्हरचा कारवरील ताबा सुटला होता. त्यामुळे ही कार अगोदर राजलक्ष्मी यांना येऊन धडकली आणि नंतर रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमेर मर्चंट असं आरोपी चालकाचं नाव आहे. तो एका खासगी कंपनीत काम करतो आणि मुंबईतील ताडदेव परिसरात राहतो. अपघात झाला त्यावेळी तो आपल्या मित्रांना शिवाजी पार्कवर सोडण्यासाठी जात होता. तर, दादर-माटुंगा परिसरात राहणाऱ्या राजलक्ष्मी आणि त्यांचे पती विजय पहाटे पाचच्या सुमारास जॉगिंगसाठी बाहेर पडले होते. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 304 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Social media, Top trending, Viral, Viral news