मुंबई 01 फेब्रुवारी : नागरिकांमध्ये नियम, कायद्यांविषयी जागृती व्हावी, अडचणीच्या काळात त्यांना तात्काळ मदत मिळावी आणि महत्त्वाची माहिती नागरिकांपर्यंत तातडीने पोहोचावी, या उद्देशाने पोलीस यंत्रणा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करताना दिसते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरात मुंबई पोलीस आघाडीवर आहेत. त्यामुळे बऱ्याचदा मुंबई पोलीस काही खास पोस्टमुळे चर्चेत असतात. मुंबई पोलिसांच्या अशा खास पोस्टला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. सध्या मुंबई पोलिसांची ट्विटरवरची एक पोस्ट आणि त्यांचं उत्तर जोरदार चर्चेत आहे.
मुंबई पोलिसांनी एका ट्विटर युझरला दिलेलं खास उत्तर नेटकऱ्यांना फार आवडलं आहे. त्यामुळे या पोस्टवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. ही पोस्ट आणि त्यावरची प्रश्नोत्तरं नेमकी काय आहेत, ते जाणून घेऊया. `एनडीटीव्ही इंडिया`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
हे ही पाहा : जुगाडाचे काही Viral Photo, जे पाहून तुमचं डोकं चक्रावेल
मुंबई पोलीस अनेकदा सोशल मीडियावरच्या मनोरंजक उत्तरांमुळे चर्चेत असतात. अशा पोस्ट्स किंवा उत्तरांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
मुंबई पोलीस त्यांच्या सर्जनशील पोस्टच्या माध्यमातून नागरिकांची मनं जिंकतात. अलीकडेच, मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हेल्पलाइन क्रमांक शेअर करून एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. या मेसेजवर एका ट्विटर युझरने फिरकी घेण्याचा प्रयत्न करून मुंबई पोलिसांकडे मदत मागितली. यावर मुंबई पोलिसांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई पोलिसांची ही प्रतिक्रिया नेटकऱ्यांना खूप आवडली आहे. पोलिसांची ही पोस्ट अनेकांनी पाहिली असून त्यावर नेटकरी कमेंट्स करत आहेत. एकूणच ही पोस्ट आणि त्यावर मुंबई पोलिसांनी दिलेली मजेशीर प्रतिक्रिया नागरिकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसतं.
If you encounter any emergencies in life, don't 'intezaar', just #Dial100.#MumbaiPoliceHaina pic.twitter.com/2JrZ0TXEHB
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) January 30, 2023
मुंबई पोलिसांनी सोमवारी त्यांच्या @MumbaiPolice या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करताना पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, `तुम्हाला आयुष्यात कधी आपत्कालीन स्थितीचा सामना करावा लागला, तर थांबू नका, फक्त #100 डायल करा.` ही पोस्ट समोर येताच एका ट्विटर युझरने मुंबई पोलिसांकडून मदत मागणारी पोस्ट शेअर केली, त्यात त्याने `मी अंतराळात अडकलो आहे,` असं लिहिलं होतं.
या युझरच्या फिरकीवर मुंबई पोलिसांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी कमेंटमध्ये म्हटलं, की `खरं तर हे ठिकाण आमच्या अधिकारक्षेत्रात नाही; पण आम्ही चंद्रावरही पोहोचू शकतो असा विश्वास तुम्हाला आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो.` पोलिसांच्या या प्रतिक्रियेनं इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai police, Social media, Top trending, Videos viral, Viral