Home /News /viral /

ATM मशीनमधून असा चोरला जातो तुमचा पिन क्रमांक, मुंबई पोलिसांनी VIDEO शेअर करत दिली माहिती

ATM मशीनमधून असा चोरला जातो तुमचा पिन क्रमांक, मुंबई पोलिसांनी VIDEO शेअर करत दिली माहिती

VIDEO पोस्ट करत मुंबई पोलिसांनी केली पोलखोल, पाहा कसा चोरला जातो तुमचा ATM पिन.

    मुंबई, 24 नोव्हेंबर : सध्याच्या काळात ATM कार्ड ही प्रत्येकाची गरज आहे. कॅश काढण्यासाठी बऱ्याचदा एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. मात्र पैसे काढण्याच्या नादात बऱ्याचदा लोकांची फसवणूकही होते. आजकाल सायबर गुन्हेगारीचे प्रमाण सतत वाढत आहे. बर्‍याच वेळा लोकांच्या बॅंक खात्यातील पैसे काही मिनिटांत निकामी केले जाते. आपल्याला याची माहिती देखील नसते आणि आपला पिन हॅक केला जातो. हे टाळण्यासाठी काय करावे, याचा एक व्हिडीओ मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध केला आहेत. हा व्हिडीओ तुम्ही हैराण व्हाल की हॅकर्स नेमका कसा तुमचा पिन हॅक करतात. मुंबई पोलिसांनी शेअर केलेला हा एक मिनिटांचा व्हिडीओ डोळे उघडवणारा आहे. व्हिडीओमध्ये मुंबई पोलिस अधिकारी एटीएम मशीनसमोर उभे आहेत. यात आपल्या पिन कोडवर हॅकर्स कसे लक्ष ठेवून असतात हे सांगण्यात आले आहे. बहुतेक कोणत्याही एटीएम मशीनमध्ये स्लॉट असतो, ज्यात आपल्याला आपले कार्ड घालावे लागते. यानंतर, आपण स्क्रीन पाहताना आपला 4 किंवा 6 अंकी पिन टाकावा लागतो. इथंच हॅकर्स आपला प्लॅन करतात. ज्या स्लॉटमध्ये तुम्ही कार्डमध्ये टाकता, चोर त्याचवर एक आपला स्लॉट तयार करतात. ज्याचे कनेक्शन कॅमेऱ्याशी जोडलेले असते. हा कॅमेरा एटीएमच्या की पॅडच्या अगदी वर असतो. म्हणजेच या कॅमेऱ्यात तुम्ही टाकलेला कोड दिसून येतो. याद्वारे चोर कार्डसह सर्व माहिती कॅमेर्‍यामध्ये कॅप्चर करतात. वाचा-1 डिसेंबरपासून सर्व ट्रेन बंद होणार?जाणून घ्या रेल्वे मंत्रालयाने काय दिलं उत्तर वाचा-मोदी सरकार 2 वर्षांपर्यंत भरणार तुमचा PF, वाचा कुणाला होणार फायदा या गोष्टी लक्षात ठेवा व्हिडीओमध्ये पोलीस अधिकाऱ्याने लोकांना स्पष्ट सांगितले आहे की, एटीएम वापरायला जाताच कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. >> तसे, प्रथम मशीनमध्ये आपले कार्ड ज्या ठिकाणी टाकत आहात तिकडे अतिरिक्त स्लॉट तर नाही ना ते तपासा. >> Key पॅडचा वरचा भाग हाताने तपासा की येथे कॅमेरा स्थापित केलेला नाही. >> तुम्हाला काही शंका असल्यास तत्काळ पोलिसांना कळवा. याबाबत बँकेकडेही तक्रार करा
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: ATM, Mumbai police

    पुढील बातम्या