VIDEO : 'जिंदगी मौत ना बन जाए...' मुंबई पोलिसांनी गाण्यातून दिला घराबाहेर न पडण्याचा सल्ला

VIDEO : 'जिंदगी मौत ना बन जाए...' मुंबई पोलिसांनी गाण्यातून दिला घराबाहेर न पडण्याचा सल्ला

कोरोनाशी लढताना 'ऑन ड्यूटी 24 तास' काम करणाऱ्या पोलिसांचं काम मात्र वाढलं आहे. पोलिस स्वत:च्या जीवाची काळजी सोडून मुंबईकरांसाठी रस्त्यावर उतरले आहेत.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : मुंबईकरांचं स्पीरीट सर्वश्रृत आहे. पण कोरोनाच्या काळात मुंबईकरांचं स्पीरीट त्यांच्या जीवावरही बेतू शकतं. अशावेळी त्यांनी घरातून बाहरे न पडणच योग्य आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी तुम्ही-आम्ही सर्वांनी घरामध्येच थांबणं केव्हाही योग्यच आहे. मात्र मुंबईसारख्या शहरातील काही सुशिक्षित विनाकारण रस्त्यावर हिंडताना दिसत होते. अशावेळी 'ऑन ड्यूटी 24 तास' काम करणाऱ्या पोलिसांचं काम मात्र वाढलं आहे. पोलिस स्वत:च्या जीवाची काळजी सोडून मुंबईकरांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई पोलिसांचे फटके पडलेले अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण सध्या एक व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पोलिसांनी फटके देऊन नाही, तर चक्क गाण्यातून घरीच राहण्याची साद घातली आहे.

(हे वाचा-लॉक डाऊनमध्ये बीचवर गेलेल्या तरुणांना पोलिसांनी हेलिकॉप्टर आणून पकडलं)

सोशल मीडियावर या पोलीस ऑफिसरच्या गाण्यााच व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्याच्या परिस्थितीसाठी अगदी चपखल असं हे गाणं ते गात आहे. 'जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारो...' हे गाणं म्हणत ते आवाहन करत आहेत की, कृपया घरीच बसा. अनेक ट्वीटर युजर्सनी हा व्हिडीओ शेअर करत या पोलिसाचं कौतुक केले आहे. अगदी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सुद्धा या व्हिडीओ त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

आपल्या देशात 14 एप्रिल पर्यंत 21 दिवसांचं लॉकडाऊन आहे. देशवासियांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये आज पुन्हा भर पडली आहे. दिवसभरात 9 रुग्णांची नोंद झाली. त्यांना भाभा रुग्णालयात आणि कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत आता कोरोनाग्रस्तांची संख्या 86 झाली आहे. काल मुंबईत एका डॉक्टरचा मृत्यू झाला. त्यामुळे एकाच शहरात आतापर्यंत 5 मृत्यू झाले आहेत. राज्यातच नाही तर देशात हा सगळ्यात जास्त आकडा आहे.

First published: March 27, 2020, 7:28 PM IST

ताज्या बातम्या