मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मुंबई पोलिसांचा James Bond थीमवर जबरदस्त परफॉर्मेन्स, सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

मुंबई पोलिसांचा James Bond थीमवर जबरदस्त परफॉर्मेन्स, सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गुप्तहेर जेम्स बाँड (James Bond) त्याच्याशी संबंधित एक म्युझिक पीस या बँडने वाजवला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस दलाचा बँड खाकी वर्दीमध्ये वादन करत आहे.

मुंबई, 25 ऑगस्ट : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आपल्या कर्तृत्वाने जगभर आपलं नाव केलं आहे. मुंबई पोलीस जसे कामासाठी प्रसिद्ध आहेत, तसेच ते सोशल मीडियावरही प्रसिद्ध आहेत. मुंबई पोलीस अकाउंटवरून जनहितार्थ अनेक पोस्ट केल्या जातात. या पोस्ट अतिशय कल्पकपणे पोलीस दलात काम करणारे अधिकारी, कर्मचारी तयार करत असतात. त्यांची कल्पकता सोशल मीडियावर या आधी अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. आताही त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आहे.

पोलीस दलातील बँड (Band, Mumbai Police Band) हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. याच बँडमधील वादकांनी एक जबरदस्त व्हिडीओ तयार केला आहे. हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गुप्तहेर जेम्स बाँड (James Bond) त्याच्याशी संबंधित एक म्युझिक पीस या बँडने वाजवला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस दलाचा बँड खाकी वर्दीमध्ये वादन करत आहे. या व्हिडीओला जेम्स बाँड थीम बाय खाकी स्टुडिओ (James Bond Theme Khaki Studio) असं नाव देण्यात आलं आहे. मुंबई पोलीस दलाचा लोगो सुरुवातीला दिसतो मग बँडचं वादन होताना दिसत.

या बँडने सिंगर माँटी नॉर्मनच्या (Monty Norman’s) जेम्स बाँड थीमला रिक्रिएट करून लोकांची मनं जिंकली आहेत. त्याशिवाय मुंबई पोलीस दलातील या योद्ध्यांनी अभिनेता डॅनियल क्रेग याच्या आगामी ‘नो टाइम टू डाई’ या चित्रपटातील एका गाण्याच्या आधारे या संगीत वादनाच्या थीमला एक वेगळाच ट्विस्ट दिला आहे. हा रिक्रिएट केलेला व्हिडीओ मुंबई पोलीस या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

भररस्त्यात महिलेने ट्रॅफिक पोलिसाला जबरदस्तीने केलं Kiss,VIDEO पाहून व्हाल हैराण

हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेम्स बाँड सीरिजमधल्या आगामी ‘नो टाइम टू डाई’ चित्रपटातील सीनही वापरण्यात आला आहे, त्यामुळे त्या वादनाची मजा आणखी वाढते.

" isDesktop="true" id="596865" >

फाटक बंद होताना पाहूनही रेल्वे रुळावर गाडी घेऊन गेला अन्...; थरारक VIDEO

पोलीसांनी यासोबत पोस्टमध्ये लिहिलं आहे, ‘खाकी स्टूडियो, मुंबई पोलीस बँड आपल्यासाठी सादर करत आहे जेम्स बाँडची थीम कम्पोज करणाऱ्या माँटी नॉर्मन यांना श्रद्धांजली. हेड कान्स्टेबल जमीर शेख यांनी या बँडवर ही थीम कम्पोज केली आहे.’ नॉर्मन यांनी पहिल्यांदा ही थीम जेम्स बाँडच्या 1962 ला प्रदर्शित झालेल्या Dr. No चित्रपटासाठी तयार केली होती.

First published:

Tags: Mumbai Poilce