Home /News /viral /

मुंबईतील पठ्ठ्याने कुत्र्यासाठी बुक केला Air Indiaचा अख्खा बिजनेस क्लास; Malteseचा चेन्नईपर्यंत राजेशाही प्रवास

मुंबईतील पठ्ठ्याने कुत्र्यासाठी बुक केला Air Indiaचा अख्खा बिजनेस क्लास; Malteseचा चेन्नईपर्यंत राजेशाही प्रवास

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

कुत्र्याच्या आनंदासाठी या मुंबईकराने खर्च केलेली रक्कम पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

    मुंबई, 18 सप्टेंबर : माणूस आणि कुत्र्यामधील (man dog friendship) मैत्री 11000 वर्षे जुनी असल्याचं मानलं जातं. कुत्रा हा माणसाचा सर्वात प्रामाणिक मित्र मानला जातो. मालकाची कुत्र्याच्या प्रती प्रमाणिकपणा सर्वांना माहीत आहेच. मात्र कुत्र्याच्या आनंदासाठी माणूस कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊ शकतो याचा तुम्ही कधी विचारही करू शकत नाही. याचं ताजं उदाहरण मुंबईत पाहायला मिळालं. येथे कुत्र्याच्या मालकाने केवळ कुत्र्यासाठी मुंबई ते चेन्नईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्व बिजनेस क्लासमधील सीट्स बुक केले. (Mumbai man booked Air India business class for dog The royal journey of the Maltese) दोन तासांच्या या प्रवासासाठी मालकाने 2.5 लाख रुपयांहून अधिक खर्च केला. सध्या देशांतर्गत विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. एअर इंडियाच्या (Air India) विमानातील बिजनेस क्लासमध्ये (Air India business class) केवळ दोन प्रवासी होते. एक कुत्रा आणि दुसरा त्याचा मालक, मालकाने माल्टीज (Maltese) जातीच्या या कुत्र्याला मुंबईहून चेन्नईला नेण्यासाठी एअर इंडियाच्या विमानातील बिजनेस क्लासमधील सर्व सीट्स बुक केल्या होत्या. हे ही वाचा-VIDEO - तडफडत होतं इवलं बदक; कुत्र्याच्या पिल्लाने जे केलं ते पाहून व्हाल भावुक मुंबई ते चेन्नईपर्यंतचा प्रवास एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसा, माल्टीज जातीचा हा कुत्रा एअर इंडियाच्या फ्लाइट एआय-671 ने बुधवारी सकाळी चेन्नईसाठी रवाना झाला. एअर इंडियाला ए320 एयरक्राफ्टमध्ये जे-क्लास केबिनमध्ये 12 जागा असतात. म्हणजे कुत्र्याने अगदी लग्जरीसह हा प्रवास केला. एअर इंडियाचा मुंबई ते चेन्नईपर्यंतचं तिकीट 20 हजार रुपये आहे. म्हणजे मालकाने आपल्या कुत्र्याच्या आरामासाठी तब्बल 2.5 लाख रुपये खर्च केले. केवळ एअर इंडियामध्ये आहे परवानगी एअर इंडिया देशातील एकमात्र विमान कंपनी आहे, ज्यात पॅसेंजर केबिनमध्ये पाळीव प्राण्यांना घेऊन जाण्याची परवानगी दिली जाते. एका फ्लाइटमध्ये दोन पेट्स घेऊन जाण्याची परवानगी असते. पेट्सना बुक्ड क्लासच्या शेवटच्या रांगेत बसवलं जातं. गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये एअर इंडिया विमानातून प्रवास करणाऱ्या पेट्सची संख्या जास्त होती. जून ते सप्टेंबरदरम्याम 2000 पेट्सनी देशांतर्गत विमाने प्रवास केला. माल्टीज कुत्रा हा टॉप कुत्र्यांच्या जातीमध्ये येतो.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Air india, Dog, Domestic flight, Mumbai, Owner of dog

    पुढील बातम्या