मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आजीबाईंचा नादखूळा! मुंबईच्या आजीने कोरोना लसीकरण केंद्रावरच साजरा केला 100 वा वाढदिवस

आजीबाईंचा नादखूळा! मुंबईच्या आजीने कोरोना लसीकरण केंद्रावरच साजरा केला 100 वा वाढदिवस

गेल्या वर्षभर जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाविषयी लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे. मात्र सध्या कोरोनाचं लसीकरण चालू झाल्यानं लोकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 8 मार्च : गेल्या वर्षभर जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाविषयी लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे. मात्र सध्या कोरोनाचं लसीकरण चालू झाल्यानं लोकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र लसीकरणाच्या कमतरतेमुळे आधी वृद्ध लोकांना प्राधान्य दिलं जातं आहे. याच पार्श्वभूमीवर देशात अनेक वृद्ध लोकांना कोरोना लसीकरण करण्यात आलं आहे. मुंबईतील एका आजीबाईंनी सुद्धा ही लस टोचून घेतली आहे. मात्र याचं वैशिष्ट्य हे आहे की लशीकरण्याच्या दिवशीच आजीबाईंनी आपल्या वयाची शंभरी पूर्ण केली.  त्यांचा 100 व वाढदिवस होता.

मुंबईतील वांद्रा -कुर्ला परिसरात राहणाऱ्या या आजीबाईंनी आधी कोरोनाचं लशीकरण केलं आणि त्यानंतर लशीकरण केंद्रावरच कर्मचाऱ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कोण आहेत ही वृद्ध महिला-

रिपोर्टरच्या माहितीनुसार या 100 वर्षांच्या आजीबाईंनचं नाव 'प्रभावती खेडकर' असं आहे. मुंबईच्या अंधेरी भागात त्या राहतात. त्या लशीकरणासाठी आल्या असता. त्यांच्या लशीकरण कार्डवर 5 मार्च 1921 अशी जन्मतारीख होती. ते पाहतच केंद्रावरील आरोग्य अधिकाऱ्यांनी लगेच केक मागवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. आणि 100 वर्षांच्या या आजीबाईंच्या वाढदिवसाचा हा व्हिडीओ अल्पावधीतच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला.

महाराष्ट्र आणि कोरोना -

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून आली. 7,863 नवीन केसेस समोर आल्या आहेत. त्याचबरोबर रुग्णांची एकूण संख्या वाढून 21,69,330 इतकी झाली आहे. एका आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आणखीन 54 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 52,238 इतकी झाली आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccine