अरे बापरे! टपटप... टपटप... पाणी नाही तर जमिनीवर चक्क कोसळला उंदरांचा पाऊस

अरे बापरे! टपटप... टपटप... पाणी नाही तर जमिनीवर चक्क कोसळला उंदरांचा पाऊस

उंदराचा पाऊस कधी ऐकलाही नसेल तो पाहायला मिळतो आहे.

  • Share this:

कॅनबेरा, 13 मे : उन्हाळ्यातही काही ठिकाणी पाऊस कोसळताना दिसतो आहे. हा पाऊस चर्चेत आहेच. पण सध्या सोशल मीडियावर सर्वाचं लक्ष एका वेगळ्याच पावसाने वेधून घेतलं आहे आणि हा पाऊल म्हणजे उंदरांचा पाऊस (Rat rain). आकाशातून जमिनीवर टपटप पावसाचं पाणी पडावं तसे उंदीर कोसळताना (Mouse rain) दिसले.

जमिनीवर शेकडो उंदीर कोसळतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता, जमिनीवर एकामागोमाग एक उंदीर पडताना दिसत आहेत. एका पाइपमधून हे उंदीर बाहेर पडत आहेत.

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉरपोरेशन जर्नलिस्ट लुसीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये काही मृत तर काही जिवंत उंदीर जमिनीवर पडताना दिसत आहेत.

माहितीनुसार हा व्हिडीओ एक शेतातील गोदामातील आहे. या गोदामात धान्य ठेवलं होतं आणि या गोदामाची साफसफाई केली जात होती. तेव्हा या गोदामातून इतक्या प्रमाणात उंदीर बाहेर पडले. गोदामातील पंपातून या उंदरांना बाहेर काढण्यात आलं. गोदामात मोठ्या प्रमाणात धान्य ठेवलेलं असल्याने गोदामात उंदीरही भरले होते.

हे वाचा - अरे आवरा यांना! Splendor वर इतके लोक बसले की मोजणंही झालंय अवघड; पाहा VIDEO

हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. एका युझरने म्हटलं मी की कधी आयुष्यात उंदारांचा पाऊस ऐकलाही नव्हता आज मी पाहिला आहे. ही खूप विचित्र परिस्थिती आहे. तर एका युझरने सर्वात वैताग आणणारी ही गोष्ट असल्याचं म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसतो आहे. चांगला पाऊस पडेल आणि परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे. पण आता या उंदरांनी शेतकऱ्यांना वैताग आणला आहे. त्यांचं नुकसान केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे आर्थिक पॅकेजची मगणी करत आहे.

हे वाचा - 12 ते 20 फूट लांब, 1500 किलो वजन, मच्छिमारांच्या जाळ्यात 'गावला' देवमासा

लुसीने या व्हिडीओसह आणखी एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये तिनं एनएसडबल्यू सरकारने 50 दशलक्ष डॉलर्सची माऊस प्लेग पॅकेजची घोषणा केल्याचं सांगितलं आहे. उंदरांमार्फत होणार प्लेग ही सामान्य समस्या नाही तर आर्थिक आणि सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांच्या  श्रेणीत येते, असं सरकारने सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: May 13, 2021, 8:55 PM IST

ताज्या बातम्या