मराठी बातम्या /बातम्या /Viral /

छोट्याशा उंदराने मांजरीला जीव नकोसा करून सोडलं; रिअल लाइफ Tom and Jerry Video एकदा पाहाच

छोट्याशा उंदराने मांजरीला जीव नकोसा करून सोडलं; रिअल लाइफ Tom and Jerry Video एकदा पाहाच

इवल्याशा उंदराने शिकार करायला आलेल्या मांजराला अशी अद्दल घडवलं की शिकार कसली ती त्याच्यासमोर जाण्याचीही हिंमत करणार नाही.

इवल्याशा उंदराने शिकार करायला आलेल्या मांजराला अशी अद्दल घडवलं की शिकार कसली ती त्याच्यासमोर जाण्याचीही हिंमत करणार नाही.

इवल्याशा उंदराने शिकार करायला आलेल्या मांजराला अशी अद्दल घडवलं की शिकार कसली ती त्याच्यासमोर जाण्याचीही हिंमत करणार नाही.

    मुंबई, 06 जून : उंदीर आणि मांजर म्हटलं की आपल्यासमोर सर्वात आधी येतो तो टॉम अँड जेरी (Tom and Jerry video). एकमेकांचे शत्रू असलेल्या उंदीर आणि मांजर या दोन प्राण्याचं मजेशीर असं नातं या कार्टुनमधून रंगवण्यात आलं आहे (Cat and mouse video). उंदरावर टपून राहिलेलं मांजर टॉम आणि त्याला पावलोपावली अद्दल घडवणारा उंदीर जेरी. प्रत्यक्षात असं पाहायला मिळत नाही. कारण आपण नेहमी मांजराला उंदराची शिकार करताना पाहतो (Real life tom and jerry). पण आता मात्र अगदी टॉम अँड जेरीप्रमाणेच प्रत्यक्षातही एक उंदीर मांजराला अद्दल घडवताना दिसला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Animal video viral on social media). एका छोट्याशा उंदराने एका मांजराला चांगलीच अद्दल घडवली आहे. शिकार करायला आलेल्या मांजरावर उंदीर असा तुटून पडला की यापुढे हे मांजर उंदारची शिकार करणं दूर त्याच्याजवळ जाण्याचीही हिंमत करणार नाही. एरवी मांजरापासून जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या, दूर पळणाऱ्या उंदराला आपण पाहिलं आहे. पण या व्हिडीओत मात्र एक मांजर आपला जीव मुठीत छोट्याशा उंदरापासून दूर पळताना दिसलं. रस्त्यातच उंदराने मांजराचा चांगलाचा बँड वाजवला आहे. हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हे वाचा - OMG! चक्क श्वानाने बनवले Cookies; विश्वास बसत नाही तर पाहा हा Chef Dog चा Video व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर एक उंदीर आणि मांजर दिसत आहे. उंदीर मांजवारवर हल्ला करत आहे. तो मांजरावर असा तुटून पडतो की बिचारं मांजर घाबरतं. मांजर गोलगोल फिरताना दिसतं.  मांजर पुढे पुढे आणि उंदीर मागे मागे असं कधीच न दिसणारं दृश्य या व्हिडीओत पाहायला मिळतं. गोलगोल फिरून मांजर इतकं थकतं की शेवटी ते एका जागी शांत बसते. उंदीरही काही अंतरावर तिच्यासमोर येऊन उभा राहतो. मांजराच्या चेहऱ्यावरील भीती पूर्णपणे दिसतं. मांजर इतकं घाबरलं आहे की शांत बसून उंदराकडे एकटक पाहतं आहे.  मांजर शांत बसल्याचं पाहिल्यानंतर उंदीर एक वेगळाच टशन दाखवत तिथून गप्पपणे निघून जातो. मांजर हळूच त्याच्या मागे जातं पण ते त्याच्यावर पाठीमागूनही हल्ला करण्याची हिंमत काही करत नाही. रस्त्यावर असं दृश्य दिसताच तिथून जाणाऱ्या गाडीतील एका व्यक्तीने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपून घेतलं. @CreatureArena ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  जो तुफान व्हायरल होतो आहे. हे वाचा - एका मोबाईलसाठी चिमुकली आणि माकडाचं भांडण; पाहा VIDEO चा मजेशीर शेवट हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना टॉम अँड जेरी कार्टुनची आठवण आली आहे. जिथं जेरी म्हणजे उंदीर नेहमीच टॉम म्हणजे मांजरावर भारी पडतं. टॉम त्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया काढत असतं, प्लॅन करत असतो. पण त्याचे सर्व प्रयत्न शेवटी फेल होतात. जेरी काही ना काही जुगाड करून टॉमच्या तावडीतून वाचून निसटून जातोच. रिलमधील असं दृश्य रिअलमध्ये क्वचितच पाहायला मिळतं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Cat, Other animal, Pet animal, Viral, Viral videos

    पुढील बातम्या