Home /News /viral /

पिल्लाला वाचवण्यासाठी सापाशी भिडली आई; उंदरीणीच्या धाडसाचा थरारक VIDEO VIRAL

पिल्लाला वाचवण्यासाठी सापाशी भिडली आई; उंदरीणीच्या धाडसाचा थरारक VIDEO VIRAL

उंदराला तोंडात घेऊन पळत होता साप, आईनं धाडस दाखवून हुसकवलं, पाहा VIDEO

    मुंबई, 28 नोव्हेंबर : प्रत्येक आई आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी जीवाचं रान करते मग ती आई कोणतीही असो. काही दिवसांपूर्वी डुकराच्या पिल्लावर वाघानं हल्ला केला होता आणि या वाघाच्या तावडीतून मादा डुकरानं आपल्या पिल्लाला वाचवलं होतं. एका बदकानं आपल्या पिल्लावर होणारा मगरीचा हल्ला वाचवण्यासाठी स्वत:चे प्राण गमवले होते. तर आता एका उंदरीणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसं पाहायला गेलं तर उंदीर आणि साप यांचं कट्टर वैर. साप उंदराला खातो पण इथे मात्र उंदरानं सापाचा पिच्छा पुरवत आपल्या पिल्लाला वाचवल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की भलमोठा साप उंदरीणीचं पिल्लू घेऊन पळत असताना उंदरीण पाहाते आणि या सापाचा पाठलाग करते. सापाच्या शेवटीला पकडून चावते आणि आपल्या पिल्लाची सुटका करते. हे वाचा-श्वानानं त्रास देऊन केलं हैराण, चिडलेल्या हत्तीनं काय केलं पाहा VIDEO या उंदरीणीच्या आणि तिच्यातल्या आईच्या धाडसाचं सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तुफान कौतुक केलं आहे. या उंदरीणीनं मोठ्या धाडसानं सापाशी वैर घेऊन आपल्या पिल्लाला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं आहे. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत 23 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 500 हून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या