मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बुलडाणा : गावाला पुराचा वेढा; मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी आईचा पुराच्या पाण्यातून टायरवर प्रवास, मन सुन्न करणारा Video

बुलडाणा : गावाला पुराचा वेढा; मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी आईचा पुराच्या पाण्यातून टायरवर प्रवास, मन सुन्न करणारा Video

काळेगाव गावातील वैशाली अंबादास काळे यांचा देवांश नावाचा चिमुकला अचानक आजारी पडला. गावाला पुराचा वेढा असल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात कसे न्यायचे असा प्रश्न काळे कुटुंबासमोर होता

    राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा 21 जुलै : बुलडाणा जिल्ह्यात चालू संततधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही गावांमधील नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. बऱ्याच ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे. यादरम्यान एक आई आपल्या मुलासाठी जीवही धोक्यात घालू शकते, याचा प्रत्यय देणारी एक घटना बुलडाण्यातून समोर आली आहे. Amublance Accident Video : टोलनाक्यावर भरधाव रुग्णवाहिकेच्या चिंधड्या उडाल्या; भयंकर अपघातातात रुग्णासह 3 ठार काळेगाव गावातील वैशाली अंबादास काळे यांचा देवांश नावाचा चिमुकला अचानक आजारी पडला. गावाला पुराचा वेढा असल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात कसे न्यायचे असा प्रश्न काळे कुटुंबासमोर होता. यावेळी मुलाच्या आईने टायरवर बसून पुरातून आपल्या चिमुकल्याला उपचारासाठी नेलं. पाच ते सहा फूट खोल पाण्यातून जीव मुठीत धरून या महिलेने आपल्या चिमुकल्याला उपचारासाठी मलकापूर येथे नेले (Mother Travels through Flood on Tire for Sick Child). या घटनेचा गावातील काही लोकांनी व्हिडिओ (Buldana Video Viral) काढला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मन सुन्न करणारा आहे. संततधार पावसामुळे मलकापूर तालुक्यातील काळेगाव या गावाचा संपर्क तालुक्यापासून तुटला आहे. कारण गावाच्या चारही बाजूने विश्र्वगंगा नदीने वेढलेलं आहे आणि तालुक्यात येण्यासाठी गावाला फक्त एकच मार्ग आहे. तो म्हणजे हरसोडा मार्गे मलकापूर. मात्र, मध्ये असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. गावकऱ्यांना कुठेही जाता-येता येत नाही आणि असंच संततधार पाऊस सुरू राहिला तर गावकऱ्यांचे हाल होतील. त्यामुळे, प्रशासनाने या गावाकडे लक्ष द्यावं, अशी मागणी गावकरी करत आहेत. विश्व गंगा नदी ही पूर्णा नदीची उपनदी आहे. ही नदी गावाच्या चारही बाजूंनी पसरलेली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Buldhana news, Mother, Shocking video viral

    पुढील बातम्या