मराठी बातम्या /बातम्या /Viral /

निशब्द करणारा PHOTO; 32 वर्षांच्या मुलाला खाद्यांवर घेऊन रुग्णालयात भटकत राहिली आई!

निशब्द करणारा PHOTO; 32 वर्षांच्या मुलाला खाद्यांवर घेऊन रुग्णालयात भटकत राहिली आई!

सोशल मीडियाच्या चमचमत्या दुनियेत हा PHOTO दाखवतो सद्य स्थिती आणि एका आईची अगतिकता!

सोशल मीडियाच्या चमचमत्या दुनियेत हा PHOTO दाखवतो सद्य स्थिती आणि एका आईची अगतिकता!

सोशल मीडियाच्या चमचमत्या दुनियेत हा PHOTO दाखवतो सद्य स्थिती आणि एका आईची अगतिकता!

  • Published by:  Meenal Gangurde

पाटना, 13 डिसेंबर : रोहतास (Bihar News) जिल्ह्यातील सासाराम रुग्णालयातून एक लज्जास्पद फोटो (Shocking Photo) समोर आला आहे. मुलाच्या उपचारासाठी रुग्णालयात पोहोचलेल्या वृद्ध महिलेला एक स्ट्रेचरदेखील मिळू शकलं नाही. शेवटी तिने मुलाला खांद्यावर घेतलं. अशाच अवस्थेत ती रुग्णालयातील वॉर्डमध्ये उपचारासाठी भटकत राहिली. (mother took 32 year old boy on her back asking for help in hospital)

मात्र कोणताही आरोग्य कर्मचारी महिलेच्या मदतीसाठी पुढे आलाच नाही. नोखा पोलीस ठाणे अंतर्गत कदवा गावात राहणारी 55 वर्षीय प्रमिला देवी आपल्या 32 वर्षीय मुलगा योगेश चौधरी याच्यावर उपचार करण्यासाठी सासाराम रुग्णालयात पोहोचली होती. प्रमिला देवीने सांगितलं की, तिचा मुलगा मजूर आहे. सायकलवरून कामावर जात असताना तो पडला, ज्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. यानंतर आपल्या मुलाला तशात अवस्थेत रिक्षातून रुग्णालयापर्यंत घेऊ आली.

रुग्णालयात बरीच चौकशी केली, मात्र तरीबी त्या आईला कोणी स्ट्रेचर दिलं नाही. यानंतर अगतिक आईने 32 वर्षांच्या मुलाला आपल्या पाठीवर घेतलं आणि रुग्णालयात गेली. मुलाला पाठीवर घेऊन उपचारासाठी ती आई वॉर्डांमध्ये भटकत होती. मात्र कोणीच स्ट्रेचर किंवा व्हिल चेअरचीदेखील व्यवस्था नाही केली.

हे ही वाचा-कोविड सेंटरच्या 15 व्या मजल्यावरून पळाला होता चोर, 7 महिन्यानंतर अखेर अटक

या प्रकरणात आरोग्य अधिकारी काहीच सांगत नसल्याचं दैनिक भास्करने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. सध्या या प्रकरणात तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Bihar, Mother