• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • आई पोटच्या मुलीकडूनच घेते घरभाडं, कारण ऐकून सगळेच झाले अंतर्मुख

आई पोटच्या मुलीकडूनच घेते घरभाडं, कारण ऐकून सगळेच झाले अंतर्मुख

आई आपल्या मुलीकडून घरात राहण्यासाठीचं (Mother takes house rent from her daughter for staying there) घरभाडं दरमहा वसूल करत असल्याची घटना समोर आल्यावर अनेकांना धक्का बसला.

 • Share this:
  आई आपल्या मुलीकडून घरात राहण्यासाठीचं (Mother takes house rent from her daughter for staying there) घरभाडं दरमहा वसूल करत असल्याची घटना समोर आल्यावर अनेकांना धक्का बसला. आपल्या मुलांचं लाडानं पालनपोषण करावं आणि त्यांना काहीही कमी (Parent and Child relationship) पडू देऊ नये, याची दक्षता प्रत्येक पालक आपापल्या परिने घेत असतात. मुलांवर कोवळ्या वयात जबाबदाऱ्या टाकू नयेत, असंही अनेक पालकांना वाटत असतं. मात्र आपल्या मुलीकडून दरमहा घराचं भाडं वसूल करणारी आई, सोशल मीडियावर (Video getting viral on social media) जोरदार व्हायरल होत आहे. मुलीकडे पाहण्याचा दृष्टीकोन न्यूझीलंडमधील केट नावाच्या महिलेनं हा व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड केला आहे. या व्हिडिओत केट आपल्या 18 वर्षांच्या मुलीसोबत एक गेम खेळताना दिसते. त्यात एक कप आणि काही पेन ठेवलेले दिसतात. हे पेन कपात टाकण्याचा हा खेळ. जर पेन कपात पडला तर जिंकलं आणि नाही पडला तर हरलं. जो हरेल त्यानं जिंकणाऱ्याचं काहीही म्हणणं ऐकायचं. मुलीकडे मागितलं भाडं या गेममध्ये हरलेल्या मुलीकडं केट एक मागणी करताना दिसते. इथून पुढं दरमहा तू या घरात राहण्यासाठीचं भाडं द्यायला पाहिजेस, असं ती मुलीला सांगते. एक वर्षभर दरमहा 2600 रुपये भाडं आपण घेणार असल्याचं ती म्हणते. मात्र त्यानंतर यामागचं कारणही सांगते. मुलीला जेव्हा घर सोडून बाहेर पडण्याची वेळ येईल, तेव्हा हेच पैसे वापरून ती स्वतःचं घर घेऊ शकेल. शिवाय या जगात काहीही मोफत मिळत नाही, हा संदेश तिला आतापासूनच मिळेल, असा विचार केट करते. हे वाचा - दोन लाखांत Ambulanceचं केलं घर, आता नांदतात सौख्यभरे; पाहा PHOTOs संमीश्र प्रतिक्रिया आपल्याच मुलीकडून घरभाडं स्विकारण्याची कल्पना अनेकांना रुचलेली नाही. कुठलीही आई असं कसं वागू शकते, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. तर इतक्या कोवळ्या वयात त्यांच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं टाकू नका, अशी सूचनाही काही नेटिझन्सनी केली आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
  Published by:desk news
  First published: