Home /News /viral /

'ए मम्मी आ गई क्या...' म्हणता म्हणता खरंच आली आई आणि...; असा झाला चिमुकलीच्या VIDEO चा शेवट

'ए मम्मी आ गई क्या...' म्हणता म्हणता खरंच आली आई आणि...; असा झाला चिमुकलीच्या VIDEO चा शेवट

आईने दिला चिमुकलीच्या व्हिडीओला मोठा ट्विस्ट

आईने दिला चिमुकलीच्या व्हिडीओला मोठा ट्विस्ट

आपल्या व्हिडीओचा शेवट इतका खतरनाक असेल याचा विचारही या चिमुकलीने केला नव्हता.

  मुंबई, 07 ऑगस्ट : 'ए मम्मी आ गयी क्या, तू मार खा गयी क्या', (Mummy aa gayi kya) सोशल मीडियावर (Social media) गेल्यावर या गाण्याचे बरेच व्हिडीओ (Viral video) तुम्हाला पाहायला मिळतील. एक चिमुकलीसुद्धा या गाण्यावर आपला व्हिडीओ (Instagram video) बनवत होती. तेव्हा खरंच तिची आई तिथं आली आणि तिच्या व्हिडीओचा शेवट असा झाला की ज्याचा तिने विचारही केला नसेल (Little girl making video and mother slap her). व्हिडीओत पाहू शकता, मुलगी हे फेमस गाणं स्वतःच गाते आहे. अगदी जोशात ती हे गाणं गात अॅक्टिंग करतानाही दिसते आहे. चिमुकली मस्त स्वतःचा व्हिडीओ बनवण्यात दंग आहे. पण आपल्यासोबत आता पुढे काहीतरी भयंकर घडणार आहे, असं तिला वाटलं नव्हतं
  View this post on Instagram

  A post shared by RVCJ Media (@rvcjinsta)

  मम्मी आ गयी क्या, मार खा गयी क्या, असं ती शेवटी बोलत राहते. इतक्यात खरंच तिची आई तिच्याजवळ येते आणि तिच्या कानशिलात लगावते. चिमुकलीला गालावर इतक्या जोरात बसतं की ती आपल्या गालावर हात ठेवून जोरजोरात रडूच लागते. काही वेळापूर्वी अगदी उत्साहात, आनंदात असलेल्या चेहरा रडवेला होतो. हे वाचा - जब तक है जान! पुराच्या पाण्यात बुडाली निम्मी गाडी तरी...; पाहा मजेशीर VIDEO मुलांना मोबाईलचं इतकं वेड लागलं आहे की मोठ्या माणसांप्रमाणे त्यांनाही असे व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरत नाही. पालक आपल्या मुलांना फोनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशाच पालकांपैकी एक या मुलीची आई. जिला कदाचित आपल्या मुलीने असे व्हिडीओ बनवणं आवडलं नाही आणि तिने तिथंच आपल्या मुलीला धडा शिकवला. हे वाचा - नवरा-नवरीचं लग्नात हे चाललंय तरी काय? VIDEO पाहून व्हाल हैराण हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. एका युझरने ही मुलगी या व्हिडीओमुळेच आता प्रसिद्ध झाली, असं म्हटलं आहे. तर एकाने पुढे जाऊन ती इन्स्टाग्राम स्टार झाली तर आपला हा स्ट्रगल नक्कीच सांगेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Funny video, Instagram, Viral, Viral videos

  पुढील बातम्या