निशब्द! मुलाच्या मृतदेहासमोर आईने गायलं लोकगीत, VIDEO VIRAL

पोटच्या पोराचा मृतदेह समोर असताना त्याची शेवटची इच्छा म्हणून आईने झालेलं दु:ख बाजूला सारत लोकगीत गायलं.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 04:16 PM IST

निशब्द! मुलाच्या मृतदेहासमोर आईने गायलं लोकगीत, VIDEO VIRAL

राजनांदगांव, 03 नोव्हेंबर : छत्तीसगढमधील राजनांदगांव जिल्ह्यात एका आईने मुलाची इच्छा पुर्ण करण्यासाठी त्याच्या मृत्यूचं दु:ख बाजूला सारलं. लोककला सादर करणाऱ्या तिच्या मुलाला चोला माटी के राम हे गाणं खूप आवडायचं. त्याची इच्छा होती की त्याच्या अंत्ययात्रेत हे गाणं म्हणावं. शनिवारी मुलाचा अचानक मृत्यू झाला. तेव्हा त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईने मृतदेहासमोरच त्याला आवडणारं लोकगीत गायलं.

एक लोककला संगीतकार अशी ओळख असलेल्या राजनांदगावमधील सुरज तिवारीचे शनिवारी निधन झालं. त्याची इच्छा होती की अंत्ययात्रेत गीत आणि संगीत वाजवण्यात यावं. घरातून अंत्ययात्रा सुरू करण्यापूर्वी त्याची आई पूनम तिवारीने मृतदेहासमोर चोला माटी के राम, एखर का भरोसा हे गीत गाऊन त्याला शेवटचा निरोप दिला.

सुरजची आई पुनम तिवारी यांनी याआधी अनेक व्यासपीठावर चोला माटी के राम, हे गाणं गायलं आहे. पण जेव्हा मुलाच्याच मृतदेहासमोर हे गाणं गाण्याची वेळ आली तेव्हा मात्र भावना रोखता आल्या नाहीत. यावेळी त्याच्या मित्रांनी तबला, हारमोनियम वाजवले. आपल्या मुलासाठी हीच योग्य श्रद्धांजली असल्याचं आईने म्हटलं.

पुनम तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या मुलाची शेवटची इच्छा होती ती पूर्ण केली असं सांगितलं. पुनम यांच्या मुलाला हृदय विकाराचा त्रास होता. गेल्या आठवड्यात त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या अकाली मृत्यूनंतर अनेकांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहण्यात आली.

Loading...

वाघिणीसाठी दोन सख्खे भाऊ भिडले, जंगलातील थरारक घटनेचा Viral Video

VIDEO : ब्रेन सर्जरीचं केलं फेसबुक लाइव्ह, पेशंट डॉक्टरांशी मारतेय गप्पा

मोबाइल पाहता- पाहता रेल्वे रुळांवर पडली महिला, समोर आली ट्रेन, पाहा Viral Video

VIDEO : संजय राऊत यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Music
First Published: Nov 3, 2019 04:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...