Home /News /viral /

भलामोठा ट्रक चिरडणार तोच..., स्वतःही मृत्यूच्या दारात असताना आईने लेकाला वाचवलं; अंगावर काटा आणणारा VIDEO

भलामोठा ट्रक चिरडणार तोच..., स्वतःही मृत्यूच्या दारात असताना आईने लेकाला वाचवलं; अंगावर काटा आणणारा VIDEO

स्वतःचा जीव धोक्यात असतानाही आईने अपघातातून मुलाचा जीव वाचवण्यासाठी धडपड केली.

    मुंबई, 27 एप्रिल : कुणी स्वतःला पोहोता येत नसतानाही नदीत उडी मारली तरी कुणी बिबट्यासारख्या भयंकर प्राण्याशीही दोनहात केले, मुलांचा जीव वाचण्यासाठी आई कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते, कोणत्या संकटाशी दोनहात करू शकते, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका आईचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जिने आपल्या लेकाला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं आहे. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे (Mother saves child in accident). एका भयंकर अपघातातून एका आईने आपल्या मुलाचा जीव वाचवला आहे. मृत्यू अगदी या मुलाच्या जवळच होणार. तो मुलाला स्पर्श करणार तोच आईने लेकाला मृत्यूच्या दारातून खेचलं. व्हिडीओ पाहून तुमच्या अंंगावर अक्षरशः काटा येईल. व्हिडीओत पाहू शकता एका बाईकवरून तीन लोक जात आहेत. या बाईकवर एक पुरुष, एक महिला आणि एक लहान मुलगा आहे. इतक्यात एक कार या बाईकच्या अगदी जवळून जाते, त्यावेळी ती बाईकला धडकते. यामुळे बाईकवरील महिला आणि मुलगा रस्त्यावर कोसळतात. हे वाचा - Shocking! मगरींच्या कळपात घुसला एकटा माणूस; अंगावर काटा आणणारा VIDEO कार तर पुढे निघून जाते. ज्या बाईकवरून हे दोघं पडतात ती बाईकही थोडं पुढे जाते. त्यानंतर त्या व्यक्तीचं त्यांच्याकडे लक्ष जातं. महिला आणि मुलगा रस्त्यावर कोसळताच दुसऱ्या बाजूने एक भरधाव ट्रक येतो. ट्रकचा चाक त्या मुलाच्या अंगावरून जाणार तोच ती महिला त्याला खेचून घेते. थोडा जरी वेळ गेला असता तरी चाक या मुलाच्या अंगावरून गेलं असतं. पण त्याच्या आईने तसं होऊ दिला नाही. तिचा जीवही धोक्यात होता, पण त्या परिस्थितीतही तिने आपल्या मुलाच्या जीवाची पर्वा केली. त्याचा जीव वाचवण्यासाठी धडपडली. हे वाचा - 'जर भारत असता तर...'; पाकिस्तानातील 8 वर्षांच्या मुलाचा VIDEO पाहून भडकले नेटिझन्स @vibeforvids नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर इंग्लंडचा क्रिकेटर जोफ्रा आर्चरनेही प्रतिक्रिया दिली आहे. जोफ्राने या महिलेला मदर ऑफ द इअर म्हटलं आहे. ही घटना 2019 मध्ये व्हिएतनामध्ये घडल्याचं सांगितलं जातं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Accident, Viral, Viral videos

    पुढील बातम्या