वॉशिंग्टन, 04 डिसेंबर : आई आपल्या मुलांसाठी कोणत्याही संकटाला सामोरं जाऊ शकते. आपल्या जीवाची बाजी लावून मुलांना मृत्यूच्या जबड्यातूनही खेचून आणते. अशाच एका आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका मुलीवर खतरनाक प्राण्याने हल्ला केला त्यानंतर तिच्या आईने कशा पद्धतीने तिचा जीव वाचवला ते संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक मुलगी दरवाजाबाहेर उभी आहे. इतक्यात एक प्राणी तिथं येतो आणि तिच्यावर हल्ला करतो. तिचा पाय पायात जबड्यात धरतो. मुलगी पाय हलवून त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करते. पण प्राण्याने तिला इतकं घट्ट पकडलं आहे की तिची सुटका होत नाही.
मुलगी मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडते. इतक्यात घरात असलेली तिची आई तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून तात्काळ घराबाहेर येते. आपल्या लेकीला एका हातात पकडते आणि दुसऱ्या हाताने तिच्या पायातील प्राण्याला खेचून बाजूला करते. त्याला एका हातात धरून ठेवते आणि दुसऱ्या हाताने दरवाजा खोलून मुलीला आत सोडते.
हे वाचा - Video : बदकासमोर हुशाऱ्या नकोच, या तरुणासोबत जे घडलं ते पाहून थांबणार नाही हसू
त्यानंतर त्या प्राण्याला दोन्ही हातांनी धरते. गरागरा फिरवते आणि दूर फेकून देते. त्यानंतर घरात जाऊन पटकन दरवाजा बंद करून घेते. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे संपूर्ण दृश्य कैद झालं, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
माहितीनुसार अमेरिकेच्या कनेक्टिकटमधील ही घटना आहे. मुलगी सकाळी शाळेत जायला निघाली होती, तेव्हा तिच्यावर या प्राण्याने हल्ला केला होता. या प्राण्याचं नाव रॅकून आहे. हा उत्तर अमेरिकेत आढळणारा एक जंगली प्राणी आहे. त्याचं वजन ४ ते ९ किलो असतं.
Mom protects daughter from raccoon 😮 pic.twitter.com/nrstilnFxU
— Fight Club (@FightClubVideos) December 3, 2022
रॅकूनने मुलीवर हल्ला केल्यानंतर तिच्या पायाला दुखापत झाली आहे. तिला रुग्णालयात नेण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wild animal