• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Video आई ही आई असते; क्षणार्धात बाळावर आलेलं मोठं संकट मातेनं आपल्यावर घेतलं आणि..

Video आई ही आई असते; क्षणार्धात बाळावर आलेलं मोठं संकट मातेनं आपल्यावर घेतलं आणि..

तुम्ही पाहू शकता की एक महिला एका लहान मुलासह भिंतीजवळ बसली आहे. अचानक तिला वाटते की भिंत पडणार आहे आणि मुलाला वाचवण्यासाठी ती भिंत पडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते.

 • Share this:
  मुंबई, 23 सप्टेंबर : आई आणि मुलाचं नातं जगात सर्वश्रेष्ठ आहे. एक आई तिच्या बाळासाठी अगदी जिद्दीनं काहीही करू शकते. आई मुलावर सर्वात जास्त प्रेम करते, त्याला प्रत्येक बिकट काळात साथ देते आणि जर मुलावर कोणतेही संकट आले तर आई ते स्वतःवर देखील घेते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्येही असेच काहीसे दिसून आले आहे. ज्यात एक आई आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी (mother saves childs life) स्वतःचा जीव धोक्यात घालते. हा व्हिडीओ (social media viral) पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की, आई एका सुपरहिरोपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे - जगाला आईची गरज आहे. 16 सेकंदांच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला एका लहान मुलासह भिंतीजवळ बसली आहे. अचानक तिला वाटते की भिंत पडणार आहे आणि मुलाला वाचवण्यासाठी ती भिंत पडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते. पण, भिंत वेगात पडू लागते. मग ही महिला क्षणार्धात आपल्या मुलाला पायाच्या मागे घेते आणि सर्व विटा तिच्या अंगावरून जमिनीवर पडतात. हे वाचा - LPG Cylinder: घरगुती गॅस सिलेंडरच्या सब्सिडीबाबत सरकारचा नवा प्लॅन, कुणाच्या खात्यात येणार पैसे? या धक्कादायक घटनेत बाळाला काहीही झालेले दिसत नाही. मग एक व्यक्ती तिथे येते आणि मुलाला त्याच्या कडेवर उचलतो. मग ती महिलाही तेथून उठते आणि सगळे तिथून निघून जातात. हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे ते माहीत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 1 लाखापेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक आईला सुपरवुमन असल्याचे सांगत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले - जगाला अशा अनेक मातांची गरज आहे. दुसऱ्याने लिहिले - आई देवापेक्षा मोठी आहे.
  Published by:News18 Desk
  First published: