नवी दिल्ली, 01 जानेवारी: केवळ बाळाला जन्म दिला म्हणून कोणी आई बनतं नसतं. त्यासाठी हृदयात ममत्व आणि आईपणाची जबाबदारी पेलण्याची कुवत असावी लागते. मग त्यासाठी तुम्ही बाळाला जन्म नाही दिला तरी तुम्हाला आई बनता येतं. आजही आपल्या देशात मुलीला कुटुंबावरील ओझं मानलं जातं. म्हणून एखाद्या दांपत्याला मुलगी झाली म्हणून त्या चिमुकल्या जिवाला रस्त्यावर किंवा एखाद्या कचरा कुंडीत मरण्यासाठी टाकून देण्याऱ्या घटनेच्या अनेक बातम्या आपण यापूर्वी वाचल्या असतील. पण सध्या सोशल मीडिया एका अविवाहित डॉक्टर महिलेचं खुप कौतुकं केलं जात आहे. या महिलेनं दोन जुळ्या नवजात मुलींना सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना फर्रुखाबाद येथील आहे. येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये एका महिलेनं जुळ्या मुलींना जन्म दिला. पण या दोन्ही मुली असल्यानं तिने या दोघींचा साभाळ करण्यास नकार दिला. यामुळे या मुली जन्मल्यानंतर आई असताना अनाथ झाल्या. पण याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉ. कोमल यादव यांनी मात्र समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी या जुळ्या मुलींच्या आईपणाची जबाबदारी स्विकारली आहे. डॉ. कोमल या अजून अविवाहित असल्याने अनेकांनी तिला हा निर्णय घेण्यास विरोध केला होता, तिला समजून सांगितलं होतं. पण डॉ. कोमल कोणाचही ऐकायला तयार झाल्या नाहीत. त्यांनी या मुलींना स्विकारलं आहे. तसेच त्यांनी सांगितलं की, जो मुलगा या दोन मुलींसोबत मला स्विकारेल अशाच मुलाशी मी लग्न करणार आहे.
(हे वाचा: सरकारबरोबर व्यवसाय करण्याच्या विचारात आहात? याठिकाणी करा नोंदणी, वाचा योजनेबद्दल)
यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. एवढ्या कमी वयात त्यांनी स्विकारलेली जबाबदारी सुद्धा मोठी आहे. यावेळी IAS ऑफिसर अवनीश शरण यांनी त्यांचा हा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. त्यांनी यात म्हटलं की, 'जुळ्या मुली होताचं आईनं त्यांना स्विकारायला नकार दिला, तेव्हा या बाळांवर उपचार करणार्या अविवाहित महिला डॉक्टर डॉ. कोमल यादव यांनी त्यांना दत्तक घेतलं आहे. डॉ. कोमल यादव सध्या फर्रुखाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात काम करतात. या दोन्ही मुलींना जो स्विकारेल अशाच मुलाशी मी लग्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
यावेळी IAS ऑफिसर दीपांशु काबरा यांनी लिहीलं की, "जन्म देणाऱ्या आईपेक्षा सांभाळ करणाऱ्या आईचं स्थान हे सर्वोपरी असतं. डॉ. कोमल यादव यांनी समाजासमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे. मला विश्वासही बसत नाही की, जगात अशा आया आहेत, ज्या बाळाला जन्म देवून, त्यांना मरण्यासाठी सोडून देतात. हे खूपच लज्जास्पद आहे. या दोन्ही मुलींना सुखी, निरोगी आणि समृद्ध जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्राथना!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.