पाटणा 13 जुलै: लग्न (Marriage) म्हटलं की अत्यंत उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण असतं. मात्र, काही लग्नसमारंभात अशा घटना घडतात ज्या सर्वांनाच हादरवून सोडतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. यात सोमवारी रात्री एका युवकाचं लग्न सुरू असतानाच त्याची प्रेयसी (Lover) याठिकाणी पोहोचली. या महिलेनं हे लग्न तर थांबवलंच, मात्र सोबतच नवरदेव (Groom) आणि वरातीतील लोकांनाही अडवून ठेवलं. सोमवारी रात्रीपासून याठिकाणी गोंधळ सुरू आहे. ही घटना बिहारच्या (Bihar) सुपौलमधील त्रिवेणीगंज ठाण्याच्या क्षेत्रातील आहे.
'मुलाची शपथ घेऊन सांग भाजपलाच मतदान केलं, तरच वीज जोडणार'; आमदाराचा VIDEO VIRAL
मिळालेल्या माहितीनुसार, सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंज ठाण्याच्या क्षेत्रातील मचहा येथील एका महिलेचे गावातीलच अरुण साह याच्यासोबत अनेक दिवसांपासून विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) होते. महिलेचं सासर राघोपूर ठाण्याच्या क्षेत्रातील हुलासमध्ये आहेत. तिला दोन मुलंही आहेत. अरूण बऱ्याचदा तिच्या घरी येत-जात असे. दोघांमधील नातेसंबंध इतके पुढे गेले की महिलेनं अरूणच्याही एका बाळाला जन्म दिला. यानंतर ती आपल्या माहेरी येऊन राहू लागली. दोघंही एकमेकांना भेटत असत. मात्र, इतक्यात अरूणचं दुसऱ्याच मुलीसोबत लग्न ठरलं.
मृत्यूचा पाळणा! एका व्यक्तीच्या तप्तरतेमुळे वाचले अनेकांचे प्राण; थरारक VIDEO
महिलेला माहिती मिळाली, की सोमवारी रात्री तिचा प्रियकर अरूण याची वरात मजरूआ गावात जात आहे आणि तो लग्न करत आहे. हे समजताच महिला आपल्या कुटुंबातील सदस्य आणि गावकऱ्यांना घेऊन तिथे पोहोचली. तिनं तिथे जात भरपूर गोंधळ घातला आणि हे लग्न थांबवलं. तुझं लग्न झालं तर फक्त माझ्याचसोबत व्हायला हवं, अशी मागणी तिनं केली. तेव्हापासून नवरदेव आणि वरातीही तिथेच आहेत. काही वराती लग्न रद्द झाल्याचं समजून परत गेले आहेत. सध्या गावात याप्रकरणी पंचायत घेऊन चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Wedding, Women extramarital affair