नवी दिल्ली 04 ऑगस्ट : असं म्हणतात, की या जगात सगळं काही मिळू शकतं. मात्र, दुसरी आई (Mother) मिळत नाही. एक आई आपल्या मुलांना येणाऱ्या प्रत्येक समस्येवर स्वतः तोडगा काढते. मग ती आई एखाद्या प्राण्याची असो किंवा माणसाची. आईचं प्रेम (Mother's Love) सारखंच असतं. आईला कधीही आपल्या मुलांना संकटात पाहायला आवडत नाही. आईला देवाचं रूपही म्हटलं जातं. अशाच एका आईचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. व्हिडिओमध्ये एक माकड (Video of Monkey) आपल्या बाळाला वाचवून सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे.
सीटसाठी एकमेकांना फोडलं; मुंबई लोकलप्रमाणे अमेरिकन विमानात प्रवाशांची फायटिंग
या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आईच्या केवळ प्रेमाचंच नाही तर धाडसाचं दर्शनही यातून होत आहे. लोकं हा व्हिडिओ पाहून आईच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक छोटं माकड एका विजेच्या तारेला लटकलं आहे. ते इथून उतरण्याचा पूर्ण प्रयत्न करतं, मात्र शेवटी अपयशी ठरतं. व्हिडिओमध्ये दिसतं, की छोटं माकड विजेच्या तारेवर बसलं आहे, तर दुसरीकडे समोरच असलेल्या बिल्डिंगवर त्याची बसलेली आहे. छोटं माकड वारंवार उडी घेऊन आपल्या आईकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे.
Mother's Love or
Friend in need.... pic.twitter.com/cg6cNUI4BI — Rupin Sharma IPS (@rupin1992) July 31, 2021
अच्छा, हे असं आहे तर! Viral Video प्रकरणात ट्विस्ट
आपलं बाळ या प्रयत्नात वारंवार अपयशी होत असल्याचं पाहून माकड आपल्या जीवाची पर्वा न करता बिल्डिंगच्या छतावरुन विजेच्या तारेवर उडी घेतं. यानंतर तिथे बसलेल्या आपल्या बाळाला घेऊन ही आई पुन्हा बिल्डिंगच्या छतावर जाऊन बसते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की आईपेक्षा मोठं या जगात कोणीच नसतं. तर आणखी एका यूजरनं म्हटलं, की आई देवाचं रूप असते. हा व्हिडिओ Rupin Sharma यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. याला कॅप्शन देत त्यांनी लिहिलं, की आईचं प्रेम की गरजेच्या वेळी मित्र.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Live video viral, Viral videos, Wild animal