नवी दिल्ली, 13 जुलै: रेल्वे स्टेशन, बस, प्रवास यात हमखास काही किस्से घडत असतात. लहान मुलांचे हात सुटतात, मुलं चुकतात, हे काही नवं नाही. मेट्रो स्टेशनवरच्या अशी एक घटना घडली. एका छोट्या बाळाला घेऊन आई मेट्रोने जायला निघाली. पण नेमकी बाबागाडी दरवाजात अडकली. ती सोडवतानाच मेट्रोचे ऑटोमॅटिक दरवाजे बंद झाले. बाळ राहिलं प्लॅटफॉर्मवर आणि आई मेट्रोमध्ये. आई बाळाला सोडून गेल्यानंतर काय झालं याचा हा VIDEO सोशल मीडियावर प्रचंड VIRAL झाला आहे. आतापर्यंत 27 कोटी 40 लाख लोकांनी तो पाहिला आहे.
ती आई मेट्रोबरोबर अगतिकपणे पुढे जाते. इथे प्लॅटफॉर्मच्या एका टोकावर बाळ एकटंच. त्याची बाबागाडी अगदी कडेला उभी असते. पुढे काय होणार हे या 6 मिनिटांच्या VIDEO मधून दिसतं. आईची ती मेट्रोत चढण्याची धडपड तिथे बाजूला प्लॅटफॉर्मवर बसलेला एक बेघर भिकारी पाहात असतो. आई बाळाला सोडून पुढे गेल्यानंतर तो पुढे येतो. बाबागाडीतल्या बाळाला निरखतो. तो बाळाबरोबर काय काय करतो ते या VIDEO मध्ये पाहा.
हा VIDEO शेवटपर्यंत पाहिलात तर लक्षात येईल की हे खरंखुरं CCTV फूटेज किंवा घटनेचा LIVE VIDEO नाही. अशाच घडलेल्या एका घटनेच्या आधारावर पुन्हा एकदा चित्रिकरण केलेला Fiction video आहे.
मित्रांना कॉल करत तरुणाची बाईकसह तलावात उडी; शेवटचे शब्द वाचून पाणवतील डोळे
पण या video मध्ये दिसणारा प्रत्येक क्षण खरा वाटतो. कुणाच्याही बाबतीत घडू शकेल असा हा प्रसंग असल्याने जगभरातल्या लाखो नव्हे तर कोट्यवधी लोकांनी हा VIDEO पाहिलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video viral