मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - अवाढव्य अजगराला चावत राहिली, ओरबडत राहिली; पिल्लाला वाचवण्यासाठी आईने धडपड केली शेवटी...

VIDEO - अवाढव्य अजगराला चावत राहिली, ओरबडत राहिली; पिल्लाला वाचवण्यासाठी आईने धडपड केली शेवटी...

पिल्लाला वाचवण्यासाठी अजगराशी भिडली कांगारू आई.

पिल्लाला वाचवण्यासाठी अजगराशी भिडली कांगारू आई.

अजगराने पिल्लाला विळखा घालताच त्या अजगराशी कांगारू आई शेवटपर्यंत लढत राहिली. तिने शक्य ते सर्व प्रयत्न केले.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 13 ऑगस्ट : आई आपल्या  मुलांवर कितीही मोठं संकट आलं तरी ढाल बनून त्या संकटाचा सामना करते. मुलांना मृत्यूच्या दाढेतूनही खेचून आणते. आईने मुलाला वाघ, बिबट्या अशा खतरनाक प्राण्यांच्या जबड्यातून वाचवल्याची प्रकरणंही तुम्हाला माहिती असतील. आईचं हे प्रेम फक्त माणसंच नव्हे तर प्राण्यांमध्येही पाहायलं मिळतं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एक मादी कांगारू आपल्या पिल्लासाठी अजगराशी भिडली आहे. एका अजगराने कांगारूवर हल्ला केला. कांगारूच्या पिल्लाला अजगराने विळखा घातला. त्यानंतर त्याची आई त्याला अजगराच्या विळख्यातून सोडवण्यासाठी धडपडू लागली. अजगर आकाराने किती मोठा असतो याची तुम्हाला कल्पना आहेच. अशा अजगरासमोर एका साध्या कांगारूची ताकद ती काय... पण या आईने आपल्या पिल्लासाठी अजगरासोबतही लढा दिला. हे वाचा - बापरे! श्वानाला वाचवण्यासाठी मुलांनी अजगराच्या विळख्यात टाकले आपले चिमुकले हात; काय झाला शेवट पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता, अजगराने कसं कांगारूला जखडून ठेवलं आहे. कांगारूची आई त्याला सोडवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. कधी अजगराला आपल्या तोंडात धरून त्याला चावण्याचा प्रयत्न करते, कधी त्याच्यावर आपले पंजे मारत नखांनी त्याला ओरबडण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून अजगर पिल्लाभोवतीचा विळखा सोडेल. पिल्ला वाचवण्यासाठी आपली सर्व ताकद ती पणाला लावते.
पिल्लाभोवतीचा अजगराचा विळखा सोडवण्यासाठी मादी कांगारू शक्य ते सर्व प्रयत्न करते. अगदी शेवटपर्यंत ती लढा देते. या व्हिडीओच्या शेवटी तरी ती आपल्या पिल्लाची सुटका करण्यात यशस्वी झाल्याचं दिसत नाही. कदाचित या पिल्लाची सुटकाही झाली नसावी. कारण अजगराचा विळखा इतका सहजासहजी सुटणार नाही. जरी ती चावली जरी तिने ओरबाडलं तरी तिचे दात आणि नखं अजगराच्या जाड त्वचेला लागण्यासारखे नाहीत. हे वाचा - समोर फणा काढून उभा राहिला खतरनाक कोब्रा, तरुणीने केलं किस; VIDEO पाहून अंगावर काटा येईल wildtrails.in इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आईचं नि:स्वार्थ प्रेम असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेक लोक व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत.
First published:

Tags: Python, Python snake, Viral, Viral videos, Wild animal

पुढील बातम्या