• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मुलीचा 35 हजाराचा बेल्ट पाहून आई चक्रावलीच; रिअ‍ॅक्शनचा भन्नाट VIDEO VIRAL

मुलीचा 35 हजाराचा बेल्ट पाहून आई चक्रावलीच; रिअ‍ॅक्शनचा भन्नाट VIDEO VIRAL

इन्स्टाग्राम यूजर (Instagram User) छबी गुप्ता हिनं लक्झरी फॅशन हाऊस गुच्चीमधून एक बेल्ट विकत घेतला. याची किंमत तब्बल 35 हजार रुपये आहे. याची किंमत तिनं आपल्या आईला सांगितली.

 • Share this:
  नवी दिल्ली 15 जून: आजकाल फॅशनला (Fashion) विशेष महत्त्व दिलं जातं. विशेषतः महागडे ब्रॅन्ड वापरणं आणि त्याची फॅशन करणं, सगळ्यांनाच शक्य नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे, की फॅशनची दुनिया अगदीच निराळी आहे. इथे कधी कोणती स्टाईल ट्रेंड (Trending Style) होऊन जाईल, हे सांगणं कठीण आहे. याच कारणामुळे दिवसेंदिवस नवीन फॅशन पाहायला मिळतात. ही फॅशन समजणं प्रत्येकाला शक्य नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहून कदाचित तुम्हालाही आईकडून ऐकाव्या लागणाऱ्या टोमण्यांची आठवण होईल. इन्स्टाग्राम यूजर (Instagram User) छबी गुप्ता हिनं लक्झरी फॅशन हाऊस गुच्चीमधून एक बेल्ट विकत घेतला. याची किंमत तब्बल 35 हजार रुपये आहे. याची किंमत तिनं आपल्या आईला सांगितली. यानंतर बेल्ट पाहून आणि त्याची किंमत ऐकून छबीच्या आईनं जे उत्तर दिलं, ते ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. नवरदेवाच्या मित्राचं स्टेजवर खोडसाळ कृत्य; गिफ्ट पाहून नवरीही लाजली, Video Viral व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की आई छबीला विचारते की हा बेल्ट तू किती रुपयांना विकत घेतलास. यावर छबी सांगते, की 35 हजार रुपये. हे ऐकताच आईला आश्चर्याचा धक्काच बसतो. तिची आई तिला विचारते, की हा 35,000 हजाराचा बेल्ट आहे? यात असं काय आहे? रांचीच्या डीपीएसच्या बेल्टसारखाच दिसत आहे आणि यावर हे जीजी काय लिहिलं आहे. हा बेल्ट तर 150 रुपयात मिळाला असता. यात असं काय आहे? आणि यावर हे असं जीजी वगैरे का लिहिलं आहे. बॅकग्राऊंडमध्ये छबीच्या हसण्याचा आवाज येतो. पुढे तिची आई तिला म्हणते, की फक्त हातात पैसे यायला हवे, मग ते उडवून टाकायचे एवढंच येतं.
  सापांमध्ये रंगला सामना; एकानं दुसऱ्याला अक्षरशः गिळून टाकलं, पाहा Shocking Video सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेक युजर्सनी या व्हिडिओवर प्रतिक्रियाही दिली आहे. एका युजरनं म्हटलं, की माझी आईदेखील अशीच प्रतिक्रिया देते. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, की हसू आवरु शकत नाही. तुझी आई खूपच प्रेमळ आहे. याशिवाय इतरही अनेक युजर्सनं यावर कमेंट करत व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: