मुंबई, 20 सप्टेंबर : माणूस असो की प्राणी जात आई आपल्या पिल्लावर आलेलं संकट थोपवून किंवा परवून लावण्यासाठी आपल्या जीवाचं रान करते. अगदी शिकारीसाठी आलेला एखादा प्राणी-पक्षी असो किंवा आपल्या पिल्लावर आलेलं नैसर्गिक संकट असो आई आपल्या काळजाच्या तुकड्याला आपल्या जीवापेक्षा जास्त जपते त्याची काळजी घेते आणि माया करते.
सोशल मीडियावर असाच एक शिकारीचा थरारक VIDEO व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जिराफाच्या पिल्लाची शिकार करण्यासाठी आलेल्या चित्त्याला मादा जिराफ पळवून लावते. आपल्या पिल्लावर शिकारीचं संकट येऊ देत नाही. त्यासाठी आपला जीव धोक्यात घालून ती चित्त्याशी पंगा घेते आणि आपल्या मुलाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
I wonder from where a mother gets such courage 💕
Here it protects its calf successfully against a coalition of Cheetahs ....
हा व्हिडीओ IFS सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 12.2 हजार लोकांनी पाहिला आहे. 187 लोकांनी रिट्वीट केला आहे. या आधी काही दिवसांपूर्वी रानडुकराच्या पिल्लाची शिकार होताना मादा डुक्कर या पिल्लाला वाघ्याच्या जबड्यातून पिल्लाची सुटका करण्यासाठी धडपडत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता जिराफाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.