मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तरुणाचं गर्लफ्रेंडच्या आईसोबत अफेअर, धक्का बसलेली तरूणी घेतेय मानसिक उपचार

तरुणाचं गर्लफ्रेंडच्या आईसोबत अफेअर, धक्का बसलेली तरूणी घेतेय मानसिक उपचार

आपल्या बॉयफ्रेंडचं थेट आपल्या आईसोबत अफेअर सुरू असल्याचं जेव्हा तरुणीला समजलं तेव्हा तिनं दोघांना रंगेहाथ पकडण्याचा निर्णय घेतला.

आपल्या बॉयफ्रेंडचं थेट आपल्या आईसोबत अफेअर सुरू असल्याचं जेव्हा तरुणीला समजलं तेव्हा तिनं दोघांना रंगेहाथ पकडण्याचा निर्णय घेतला.

आपल्या बॉयफ्रेंडचं थेट आपल्या आईसोबत अफेअर सुरू असल्याचं जेव्हा तरुणीला समजलं तेव्हा तिनं दोघांना रंगेहाथ पकडण्याचा निर्णय घेतला.

  • Published by:  desk news

न्यूयॉर्क, 13 डिसेंबर: आपल्या बॉयफ्रेंडचं (Boyfriend) आपल्याच आईसोबत (Mother) अफेअर सुरू असल्याचं समजल्यानंतर तरुणीला मोठा मानसिक धक्का (Psychological shock) बसला आहे. टिकटॉकवर (Tiktok) तिनं आपली कहाणी शेअर केली असून जगात आपल्याच जवळचे लोक आपल्याशी असं कसं वागू शकतात, असा सवाल तिनं उपस्थित केला आहे. काही वेळा नातेसंबंध असे काही एकमेकांत गुंतून जातात की त्याचा गुंता सोडवणं हे सर्वांसाठीच मोठं आव्हानात्मक बनू लागतं. आपला बॉयफ्रेंड आणि आपली आई या दोघांनी मिळून आपलं मानसिक जग उद्धवस्त केल्याचा आरोप या तरुणीनं व्हिडिओत केला आहे.

असं उघडकीला आलं अफेअर

तरुणीनं टिकटॉक व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार ती 16 वर्षांची असताना तिचं एका 18 वर्षांच्या तरुणावर प्रेम जडलं. दोघंही रिलेशनशिपमध्ये राहू लागले आणि तरुण तिच्या घरी येऊ लागला. काही दिवसांतच तरुणाची तरुणीच्या आईवडिलांशी ओळख झाली आणि तो त्यांना घरकामातही मदत करू लागला. सर्व काही सुरळीत आहे, असं वाटत होतं, मात्र आपला बॉयफ्रेड आपल्यापेक्षा आपल्या आईलाच अधिक वेळ देत असल्याचं तरुणीला जाणवू लागलं होतं. मनात संशयाची पाल चुकचुकल्यामुळं तिनं याची खातरजमा करण्याचा निर्णय़ घेतला.

टिकटॉकवर आपले अनुभव शेअर करणारी तरुणी

दोघांना पकडलं रंगेहाथ

‘द सन’नं दिलेल्या बातमीनुसार तरुणीने एक दिवस दोघांनाही रंगेहाथ पकडलं. वडील त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते आणि तिचा बॉयफ्रेंड आईसोबत किचनमध्ये भांडी घासत होता. त्यावेळी अचानक किचनमध्ये प्रवेश केलेल्या तरुणीला मोठा धक्का बसला. तिथे तिची आई बॉयफ्रेंडच्या बाहुपाशात होती आणि दोघं एकमेकांना किस करत होते. हा प्रसंग पाहून तिनं दोघांनाही याबाबत विचारणा केली. मात्र दोघांनीही तिला वेडी ठरवून तिच्यावर मानसिक उपचार सुरू केले.

हे वाचा- PubG and Free Fire गेमसाठी लहान भावाचा घेतला जीव; हे वाचून पायाखालची जमीन सरकेल

आई झाली प्रेगनंट

तरुणीवर मानसिक उपचार सुरू झाल्यामुळे तिला काही काळ खरोखरच असं वाटू लागलं होतं की तिनं जे पाहिलं, तो भास असावा. मात्र त्यानंतर काहीच महिन्यांनी एका पार्टीत तिला तिच्या बॉयफ्रेंडचा मोबाईल मिळाला. त्यात बॉयफ्रेंड आणि आई यांचे अश्लिल फोटो पाहून तिला खात्री पटली आणि तिने वडिलांना हे फोटो दाखवले. ते पाहून वडिलांनाही धक्का बसला आणि दोघं घरी पोहोचले. त्यावेळी तरुणीची आई आपले कपडे आणि कार घेऊन घरातून निघून गेली होती. त्यानंतर काही वर्षांनी आपली आई तिच्या एक्स-बॉयफ्रेंडपासून प्रेग्नंट असल्याचं तरुणीला समजलं. या घटनेमुळं आपलं मानसिक आय़ुष्य उद्ध्वस्त झाल्याचं तिनं या व्हिडिओत शेअर केलं आहे.

First published:

Tags: Boyfriend, Girlfriend, Love story, Mother