VIDEO : विसराळूपणाचा कहर! मुलांना शाळेत सोडायला गेलेल्या आईला हसू आवरेना, पाहा असं काय घडलं?

VIDEO : विसराळूपणाचा कहर! मुलांना शाळेत सोडायला गेलेल्या आईला हसू आवरेना, पाहा असं काय घडलं?

मुलांना शाळेत सोडायला निघालेल्या आईचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 46 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 4 मिलियन लोकांनी पाहिला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : तुम्हाला एखादी वस्तू कोणाला द्यायची असेल आणि तीच वस्तू तुम्ही विसरलात तर? पुढच्यावेळी देऊ असं म्हणून शकतो. पण जर एखाद्या व्यक्तीला कुठेतरी सोडायचं आहे आणि त्याच व्यक्तीला विसरलात तर मात्र विचार करावा लागेल. असा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. एक आई तिच्या मुलांना कारने शाळेत सोडण्यासाठी निघाली होती आणि अर्ध्या रस्त्यात आल्यावर तिला आठवण झाली की मुलंच गाडीत नाहीत.

आईला जेव्हा समजतं की तिच्या गाडीत मुलं नाहीत तेव्हा लक्षात येतं की आपण मुलांना गाडीत बसवायलाच विसरलो आहे. आपली चूक लक्षात आल्यानंतर त्या आईला हसू आवरत नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट झाला आहे. लोकही हा व्हिडिओ पाहून हे कसं शक्य आहे असं म्हणत आहेत.

एका ट्विटर युजरने हा व्हिडिओ 24 फेब्रुवारीला शेअर केला होता. लोकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत एक लाखाहून अधिक युजर्सनी रिट्विट केलं आहे.व्हिडिओमध्ये आई जोरजोरात हसताना दिसते. चूकच अशी आहे की ज्यावर हसू येणं स्वाभाविक आहे. कोणी आपल्या मुलांना शाळेत सोडायला जाताना कसं विसरु शकतं.

आई म्हणते की, मुलं कारमध्ये नाहीत. मला त्यांना पुन्हा आणायला जावं लागेल. माझा यावर विश्वासच बसत नाही. मी कसं काय माझ्या मुलांना घरी सोडून आले. मला त्यांना शाळेत सोडायला जायचं होतं आणि मी एकटीच कारमध्ये बसून निघाले असं आई म्हणते.

हेच बाकी राहिलं होतं! Coronavirus होऊ नये म्हणून प्रवाशाने विमानात केला कहर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mother
First Published: Feb 26, 2020 09:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading