Home /News /viral /

पिल्लासाठी हत्तीणीची धडपड; सोंडीत पकडून 7 KM फिरत राहिली, कारण जाणून व्हाल भावुक, VIDEO

पिल्लासाठी हत्तीणीची धडपड; सोंडीत पकडून 7 KM फिरत राहिली, कारण जाणून व्हाल भावुक, VIDEO

जलपाईगुडी येथील चहाच्या बागेत शुक्रवारी एका हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला. मादा हत्ती आपल्या मृत पिल्लाचा मृतदेह घेऊन अनेक बागांमध्ये फिरत राहिली.

    नवी दिल्ली 28 मे : आई ही ममतेची मूर्ती असते. मग ती माणसाची असो वा प्राण्याची. हेही कटू सत्य आहे की कोणत्याही आईसाठी मुलाच्या मृत्यूपेक्षा मोठं दु:ख दुसरं काहीही असू शकत नाही. याचं जिवंत उदाहरण पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमध्ये पाहायला मिळालं. एक मादी हत्ती आपल्या मृत मुलाला घेऊन अनेक तास इकडे तिकडे फिरत होती (Mother Elephant seen Carrying Carcass of Dead Calf). या वेदनादायक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आईबाबांना VIDEO CALL करत लेकाने विमानातून मारली उडी; अंगावर काटा आणणारं दृश्य एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जलपाईगुडी येथील चहाच्या बागेत शुक्रवारी एका हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला. मादा हत्ती आपल्या मृत पिल्लाचा मृतदेह घेऊन अनेक बागांमध्ये फिरत राहिली. ती आपल्या मृत पिल्लाला सोंडेत पकडून तब्बल 7 किलोमीटर चालत राहिली. पिल्लाच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. चामुर्ची ग्रामपंचायत परिसरातील अंबारी चहाच्या बागेतील हे भावुक करणारं दृश्य ज्यांनी पाहिलं त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. शुक्रवारी सकाळी या भागातील चहाबागेतील कामगारांनी मादा हत्ती आपल्या मृत पिल्लाला सोंडेत धरून घेऊन जात असल्याचं हृदय पिळवटणारं दृश्य पाहिलं. लहान जीव समजून पंगा घेणं हत्तीला भोवलं; इवल्याशा पक्षाने गजराजची केली वाईट अवस्था, पाहा VIDEO त्यानंतर बिनागुरी वन्यजीव पथकाचे वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र मृत हत्तीच्या पिल्लाला आईपासून वेगळं करण्याची संधी वनकर्मचाऱ्यांना मिळाली नाही. मादा हत्तीण तिचं पिल्लू सोंडेत घेऊन चुनाभट्टी चहाच्या बागेपासून ६ किमी अंतरावर असलेल्या रेडबँक चहाच्या बागेत गेली. मादा हत्ती कोणत्याही परिस्थितीत तिच्या पिल्लाला सोडायला तयार नव्हती. आईचं प्रेम आणि तिचं दुःख पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले. एएनआय या वृत्तसंस्थेनं शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 20 हजारहून अधिकांनी पाहिला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Elephant, Video Viral On Social Media

    पुढील बातम्या