मराठी बातम्या /बातम्या /Viral /पिल्लू खड्ड्यात पडताच बेशुद्ध झाली आई, पिल्लू बाहेर येताच शुद्धीवर आली; पाहा चमत्कारिक VIDEO

पिल्लू खड्ड्यात पडताच बेशुद्ध झाली आई, पिल्लू बाहेर येताच शुद्धीवर आली; पाहा चमत्कारिक VIDEO

रेस्क्यू टिमने हत्तीणीला शुद्धीवर आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण जेव्हा पिल्लाचा स्पर्श झाला तेव्हाच हत्तीण उठून उभी राहिली.

रेस्क्यू टिमने हत्तीणीला शुद्धीवर आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण जेव्हा पिल्लाचा स्पर्श झाला तेव्हाच हत्तीण उठून उभी राहिली.

रेस्क्यू टिमने हत्तीणीला शुद्धीवर आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण जेव्हा पिल्लाचा स्पर्श झाला तेव्हाच हत्तीण उठून उभी राहिली.

मुंबई, 15 जुलै : आईचा जीव आपल्या पिल्लांमध्ये अडकलेला असतो. फक्त माणसंच नव्हे तर मुक्या जीवांमध्येही अशी ममता दिसून येते. सध्या हत्तीण आई आणि तिच्या पिल्लाचा असाच एक इमोशनल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पिल्लाला खड्ड्यात पडताना पाहून हत्तीण बेशुद्ध झाली. पण जसं पिल्लू खड्ड्याबाहेर आलं, तशी ही आईसुद्धा शुद्धीवर आली. व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातही पाणी आल्याशिवाय राहणार नाही (Mother Elephant Baby Reunion).

हत्तीण आपल्या पिल्लासोबत जास असताना एका खड्ड्यात तिचं पिल्लू पडलं. त्याच क्षणी त्याची आईही बेशुद्ध झाली. आता आपण आपलं पिल्लू गमावलं, असं तिला वाटू लागलं. त्याच खड्ड्याजवळ बाहेर ती बेशुद्ध झाली. या दोघांच्याही मदतीसाठी रेस्क्यू टीम धावून आली. हत्तीण आणि तिच्या पिल्लाला वाचवण्यासाठी रेस्क्यू टिम अथक प्रयत्न करत होते.

हे वाचा - बापरे! 3-3 बैलांनी एकत्र महिलेला शिंगांनी उडवून पायाखाली तुडवलं; अंगावर काटा आणणारा VIDEO

व्हिडीओत पाहू शकता एक हत्तीण बेशुद्ध होऊन पडलेली दिसते आहे. रेस्क्यू टीम तिच्या मदतीसाठी आली आहे. तिला शुद्धीवर आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सीपीआर देऊन तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण किती प्रयत्न केले तरी हत्तीण काहीच रिस्पॉन्स देत नाही. तिच्यात काहीच हालचाल होत नाही.  दुसरीकडे तिचा पिल्लू खड्ड्यात पडला आहे. त्यालाही खड्ड्याबाहेर काढण्यासाठी धडपड सुरू आहे. पण खड्ड्यातील माती ओली असल्याने पिल्लू घसरत होतं.

अखेर पिल्लाला खड्ड्याबाहेर काढण्यात यश आलं. पिल्लू खड्ड्याबाहेर येताच ते धावत आपल्या आईकडे गेलं आणि आईला उठवण्याचा प्रयत्न करू लागलं. चमत्कार तर पाहा. जी हत्तीण इतक्या माणसांनी इतके प्रयत्न करूनही उठत नव्हती. ती पिल्लाच्या स्पर्शान आणि आवाजाने लगेच शुद्धीवर आली आणि पिल्लाला आपल्या डोळ्यासमोर सुखरूप पाहताच लगेच उठून उभी राहिली. तेव्हा रेस्क्यू टिमलाही अश्रू आवरले नाही.

हे वाचा - मुंगुसाला चढता येत नव्हतं भिंतीवर, त्याच्या मित्राने जे केलं त्याचा VIDEO पाहून थक्क व्हाल!

आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी रेस्क्यू टीमचंही कौतुक केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Elephant, Viral, Viral videos, Wild animal