मराठी बातम्या /बातम्या /Viral /पिल्लांना वाचवण्यासाठी मांजर थेट कुत्र्याशी भिडली, शेवट अनपेक्षित, वारंवार बघाल VIDEO

पिल्लांना वाचवण्यासाठी मांजर थेट कुत्र्याशी भिडली, शेवट अनपेक्षित, वारंवार बघाल VIDEO

एक कुत्रा रस्त्यावरून चालत असताना मांजरीच्या पिल्लावर वार करतो. ते पाहून मांजराची आई आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी लगेच पुढे येते आणि कुत्र्याचा सामना करते.

एक कुत्रा रस्त्यावरून चालत असताना मांजरीच्या पिल्लावर वार करतो. ते पाहून मांजराची आई आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी लगेच पुढे येते आणि कुत्र्याचा सामना करते.

एक कुत्रा रस्त्यावरून चालत असताना मांजरीच्या पिल्लावर वार करतो. ते पाहून मांजराची आई आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी लगेच पुढे येते आणि कुत्र्याचा सामना करते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 02 एप्रिल : अनेकदा पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. ज्यामध्ये बहुतांश व्हिडिओ फक्त कुत्र्या आणि मांजरीचे असतात. लोक अनेकदा घरात कुत्रं आणि मांजरींसोबत आपला वेळ घालवताना दिसतात. ज्या दरम्यान हे प्राणीही खूप मजा करत मालकासोबत खेळताना दिसतात. मात्र सध्या सोशल मीडियावर कुत्रा आणि मांजरीचा एक वेगळा व्हिडिओ समोर आला आहे. ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कसं शक्य आहे? मगरीच्या पोटातून जसाच्या तसा जिवंत बाहेर आला माणूस; आजवर कधीच पाहिला नसेल असा VIDEO

अनेकदा आपण असे व्हिडिओ पाहत असतो, ज्यामध्ये आई आपल्या मुलासाठी त्याग करताना किंवा कष्ट करताना दिसते. सध्याच्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा रस्त्यावरून चालत असताना मांजरीच्या पिल्लावर वार करतो. ते पाहून मांजराची आई आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी लगेच पुढे येते आणि कुत्र्याचा सामना करते. जे पाहून कुत्र्याला माघार घ्यावी लागते.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. ट्विटरवर @TheFigen_ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्यासोबत घराबाहेर फिरताना दिसत आहे. कुत्र्याला भटक्या मांजरीचे पिल्लू दिसले की तो त्याच्यावर झडप घालतो. पिल्लाला अडचणीत पाहून मांजर वेगाने धावत येते आणि एकापाठोपाठ एक अनेक वेळा कुत्र्यावर हल्ला करून त्याला मागे हटण्यास भाग पाडते.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ही बातमी लिहिपर्यंत सोशल मीडियावर 1.2 मिलियन पेक्षा जास्त म्हणजे 12 लाख वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. त्याच वेळी, 21 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी लाईक केला आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, 'मला वाटतं इथे काही गैरसमज आहे, कुत्र्याला फक्त मांजरीच्या पिल्लांशी खेळायचं आहे, पण आई खूप संरक्षक आहे.' दुसरीकडे, बहुतेकांचं म्हणणं आहे की आपल्या पिल्लांना संकटात पाहून कोणत्याही आईचं हृदय हेलावून जातं.

First published:
top videos

    Tags: Cat, Dog, Social media viral