हे प्रकरण आंतरजातीय विवाहाचं आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या हमीपुरमधील आहे. सुमेरपुरचा रहिवासी असलेल्या उमेशचंद्र यानं शेजारीच राहणाऱ्या एका तरुणीसोबत काही दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज केलं होतं. यानंतरपासून दोघंही पती-पत्नी म्हणून एकत्र राहत होते. मात्र, या कोर्ट मॅरेजला उमेशच्या घरच्यांचा विरोध होता. तर, मुलीच्या वडिलांना आपल्या मुलीचं मोठं आणि उत्साहात लग्न करायचं होतं. यामुळे एका गेस्ट हाऊसमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. Oh no! वरमाळा घालतानाच निसटला नवरदेवाचा पायजमा अन्...; लग्नातील फजितीचा VIDEO यासाठी मुलीच्या वडिलांनी जावयाच्या आई-वडील आणि भावांना आमंत्रण दिलेलं नव्हतं. ज्यावेळी स्टेजवर वधू आणि वर एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालत होते तेव्हाच तेव्हाच नवरदेवाची आई तोंडाला कापड बांधून स्टेजवर चढली. तिनं संधी मिळताच पायातील चप्पल काढून नवरदेवाला मारहाण करण्यास सुरुवात केली. नवरदेवानं प्रयत्न करून यावेळी आपला बचाव केला. यादरम्यान उपस्थितांनी नवरदेवाच्या आईला स्टेजवरुन खाली उतरवलं. यानंतर सर्वांनी शिवीगाळ करत ही महिली इथून निघून गेली.जब दूल्हे को मां ने दिया चप्पलों का आशीर्वाद... वायरल वीडियो हमीरपुर का बताया जा रहा है.. pic.twitter.com/OllwcrK5VR
— Manu Teotia (anchor@News18) (@ManuTeotia1) July 4, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Shocking video viral, Social media viral, Wedding video