मराठी बातम्या /बातम्या /Viral /आईने विमानतळावरच मुलाला चपलेने बदड बदड बदडलं; मायलेकाच्या हटके भेटीचा VIDEO

आईने विमानतळावरच मुलाला चपलेने बदड बदड बदडलं; मायलेकाच्या हटके भेटीचा VIDEO

आईने मुलावर प्रेमाऐवजी केला चपलांचा वर्षाव.

आईने मुलावर प्रेमाऐवजी केला चपलांचा वर्षाव.

आईने मुलावर प्रेमाऐवजी केला चपलांचा वर्षाव.

मुंबई, 01 डिसेंबर : आई (Mother love) आपल्या मुलांपासून फार काळ दूर राहू शकत नाही. काही कारणांमुळे ती आपल्या मुलांपासून काही दिवसही दूर असेल आणि त्यानंतर ती आपल्या मुलांना भेटली तर त्यांना आपल्या मिठीत घेते (Mother love video), त्यांच्या डोक्यावरून हात फिरवते. कधी कधी तर आईच्या डोळ्यातही आपल्या मुलांना भेटल्याचा आनंद झळकतो. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात (Mother child video). आईची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत ही अशीच असते (Mother son video). पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात एका आईने आपल्या मुलावर हटके पद्धतीने प्रेम व्यक्त केलं आहे (Mother beat son with chappal at airport).

इतक्या दिवसांनी भेटलेल्या मुलासोबत आईने जे केलं ते पाहून थोडं आश्चर्य वाटेल पण हसूही आवरणार नाही. मायलेकाच्या हटके भेटीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Mother beat son at airport).

View this post on Instagram

A post shared by Anwar Jibawi (@anwar)

व्हिडीओत पाहून हा एखाद्या विमानतळावरील असावं, असं दिसतं. एक मुलगा पुष्पगुच्छ आणि हातात बोर्ड घेऊन आपल्या आईला घ्यायला विमानतळावर पोहोचला आहे. आम्ही तुझी आठवण काढली, असं या बोर्डवर लिहिलं आहे. जशी त्याची आई विमानतळावरून बाहेर येते, तसा मुलगा हातात बोर्ड घेऊन तिच्या दिशेने जातो.

हे वाचा - WOW! डॉल्फिनने गाण्यावर लगावले जबरदस्त ठुमके; Dolphin चा Dance video एकदा पाहाच

आई-मुलाची इतक्या दिवसांनी भेट म्हणजे दोघंही एकमेकांना मिठी मारतील, असंच आपल्याला वाटतं. त्या मुलालाही तशीच अपेक्षा होती. पण त्याची आई गेटच्या बाहेर पडताच समोर येत असलेल्या मुलाला पाहून त्याच्या आईने जे केलं ते पाहून  आपल्या पायातील एक चप्पल काढते आणि त्याच चपलेने मुलाची विमातळावरच धुलाई करते. मुलाला ती अक्षरशः बदडून काढते आणि शेवटी ती त्याच्यावर चप्पल फेकूनही मारते. आई आपल्या मुलावर चप्पलांच्या माराचा वर्षावर करते.

हे वाचा - नेहमी उच्छाद मांडणाऱ्या माकडाने केलं असं काम; VIDEO पाहून माणसांनाही वाटेल लाज

अनवर जिबावी नावाच्या इन्स्टाग्राम युझरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. माझी आई परत आली, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही जण हैराण झाले आहेत, तर काही जणांनी हा व्हिडीओ मजेशीर असल्याचं म्हटलं आहे. आईचा चपलेने मार खाणाऱ्या या तरुणाची बहुतेकांनी चांगलीच मजा घेतली आहे. हे आईचं प्रेम असून हे बेस्ट आहे, असंही काही युझर्सनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Funny video, Parents and child, Viral, Viral videos