• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • सासू-सासऱ्यांनी सुनेकडे मागितले मृत मुलाचे स्पर्म; अजब मागणीमुळे हैराण महिलेनं सांगितली व्यथा

सासू-सासऱ्यांनी सुनेकडे मागितले मृत मुलाचे स्पर्म; अजब मागणीमुळे हैराण महिलेनं सांगितली व्यथा

आजच्या धावपळीच्या काळात ताण येणं नॉर्मल झालेलं आहे. त्यामुळेच आपलं नुकसानही होतं. भारतात 10 व्यक्तीमध्ये 7 जणाना तणावाची समस्या असल्याचं एका संशोधनात पुढे आलेलं आहे.

आजच्या धावपळीच्या काळात ताण येणं नॉर्मल झालेलं आहे. त्यामुळेच आपलं नुकसानही होतं. भारतात 10 व्यक्तीमध्ये 7 जणाना तणावाची समस्या असल्याचं एका संशोधनात पुढे आलेलं आहे.

वृद्ध दाम्प्त्यानं आपल्या विधवा सुनेकडे फ्रिज केलेल्या स्पर्मची मागणी केली आहे. मुलगा या जगातून गेला, मात्र त्याच्या मुलाला मोठं करून कुटुंब पुढे चालवण्याची या वृद्ध दाम्प्त्याची इच्छा आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 07 ऑगस्ट : पतीच्या मृत्यूनंतर एक महिला अजब संकटात सापडली आहे. या महिलेच्या सासू अन् सासऱ्यांची अशी इच्छा आहे, की आपल्या मुलाची बाळांना आपल्या मांडीवर खेळवावं. यासाठी त्यांनी विधवा सूनेकडे आपल्या मुलाचे फ्रिज केले गेलेले स्पर्म (Sperm of Dead Son) मागितले आहेत. मात्र, ही महिला आपल्या पतीचे स्पर्म देण्यासाठी इच्छुक नाही. तिनं सोशल मीडियावर (Social Media) आपल्यासमोरील ही समस्या शेअर करत सल्ला मागितला आहे. यावर लोकांनी अनेक प्रकारच्या कमेंट (Comment) केल्या आहेत. काही लोकांनी महिलेची बाजू घेतली आहे, तर काहींनी तिच्या सासू- सासऱ्यांची. प्रत्येक आजी - आजोबांचं असं स्वप्न असतं, की आपली नातवांडे आपल्या कुशीत खेळावी. त्यांचा भरपूर लाड करावा. मात्र, या घटनेत मुलाचा लवकरच मृत्यू झाल्यानं वृद्ध दाम्प्त्यानं आपल्या विधवा सुनेकडे फ्रिज केलेल्या स्पर्मची मागणी केली आहे. मुलगा या जगातून गेला, मात्र त्याच्या मुलाला मोठं करून कुटुंब पुढे चालवण्याची या वृद्ध दाम्प्त्याची इच्छा आहे. मिरननं दिलेल्या वृत्तानुसार, महिलेनं सोशल मीडिया साईट रेडिटवर आपली समस्या शेअर करत लिहिलं, की तिला आपल्या पतीचे स्पर्म सासू-सासऱ्यांकडे द्यायचे नाहीत. VIDEO: घाणेरड्या पाण्यापासून चपलांना वाचवायला गेला, त्याच पाण्यात धाडकन कोसळला महिलेनं सांगितलं, की जेव्हा तिला तिच्या पतीला कॅन्सर (Cancer) असल्याचं समजलं, तेव्हा तिनं त्याचे स्पर्म फ्रिज केले. जेणेकरून किमोथेरेपीनंतरही त्यांनं मुलं जन्माला घालणं शक्य होईल. पतीच्या उपचारादरम्यान महिलेचे सासू-सासरेही त्यांच्यासोबत होते. सासू-सासऱ्यांना पती-पत्नीनं घेतलेल्या या निर्णयाची कल्पना होती. महिलेनं सांगितलं की दुर्देवानं तिच्या पतीचा कॅन्सर बरा झाला नाही आणि 19 जुलै रोजी पतीचा मृत्यू झाला. यानंतर सासू-सासऱ्यांनी महिलेला विचारलं, की पतीच्या स्पर्मपासून गर्भधारणेचा तू काही विचार केला आहेस का, यावर तिनं नकार दिला. लग्न होताच नवरीसोबत Cheating करू लागला नवरदेव; तिसरीनंच पकडला हात अन्.., VIDEO यानंतर सासू अन् सासऱ्यांनी तिला आपल्या मुलाचे स्पर्म आपल्याकडे देण्यास सांगितलं. जेणेकरून ते सरोगसीच्या माध्यमातून आजी-आजोबा बनू शकतील. मात्र, त्यांच्या या मागणीमुळे महिला हैराण झाली. तिनं म्हटलं, की आम्ही हे स्पर्म यासाठी फ्रिज केले होते, की आम्हाला सोबत मिळून आमचं कुटुंब पुढे घेऊन जायचं होतं. मात्र, आता मी या विचारात आहे, की सरोगसीद्वारे बाळाचा जन्म झाल्यास ते या बाळांचा सांभाळ कसा करतील. कारण ते दोघंही 60 च्या दशकातील आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: