मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'कपडे काढून पूजा कर, वडिलांचं कर्ज माफ होईल' आणि नग्न पूजेचा VIDEO झाला व्हायरल...

'कपडे काढून पूजा कर, वडिलांचं कर्ज माफ होईल' आणि नग्न पूजेचा VIDEO झाला व्हायरल...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कोणत्याही गोष्टींवर श्रद्धा असणे ही एक चांगली गोष्ट आहे. पण अंधश्रद्धेचा शेवट हा वाईटच

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 05 ऑक्टोबर : कोणत्याही गोष्टींवर श्रद्धा असणे ही एक चांगली गोष्ट आहे. ज्यामुळे लोकांना पॉझिटीव्हीटी मिळते. पण देशात असे देखील लोक आहेत, जे अंधश्रद्धेच्या आहारी गेले आहेत. ज्यासाठी ते काहीही करण्याची तयारी दाखवतात. परंतू याचा परिणाम नेहमीच वाईट होतो, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. कर्नाटकातून एक असंच विचित्र प्रकरण समोर आलं आहे. जे धक्कादायक आहे.

कर्नाटकात एका मुलाला कपड्यांशिवाय पूजा करण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी अल्पवयीन मुलाला कपडे उतरवून नग्न पूजा करण्यास भाग पाडले, ज्यानंतर त्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला.

या अल्पवयीन मुलाचे वय 16 वर्षे आहे. या मुलाला बळजबरी केली गेली होती की, तुला तुमच्या वडिलांवरील कर्ज लवकर फेडावे असे वाटत असेल, तर त्याने नग्न होऊन पूजा करावी. ज्यानंतर या मुलाने देखील त्याला जे जे सांगितलं गेलं, तसं केलं देखील. परंतू हे सगळं करत असताना त्या मुलाचा व्हिडीओ काढला गेला आणि त्यानंतर त्याला व्हिडीओला सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं.

हे वाचा : पाण्याच्या बाटलीत दिलं अ‍ॅसिड, रेस्टॉरंटमधील बर्थ डे पार्टीतला धक्कादायक प्रकार

ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तीन आरोपींना अटक देखील केली. अधिकाऱ्यांनी या आरोपींची ओळख शरणप्पा तलवारा, विरुपनगौडा आणि शरणप्पा ओजानहल्ली अशी केली आहे, ते सर्व कोप्पलचे रहिवासी आहेत आणि ते पीडिताच्या ओळखीचे आहेत.

ही घटना जून महिन्यातील असली तरी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात आली आहे. या व्हिडीओबाबत मुलाच्या पालकांना समजल्यानंतर रविवारी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे वाचा : तू तुझ्या बायकोला कधी सोडशील? ड्राइवरने विवाहित पुरुषाचं गर्लफ्रेंडसोबतचं बोलणं ऐकलं आणि मग...

माहितीनुसार तिन्ही आरोपींनी अल्पवयीन मुलाच्या पालकांशी संपर्क साधला होता आणि त्यांना हुबळी येथील जल जीवन मिशनमध्ये एकत्र काम करण्यासाठी पाठवण्यास सांगितले होते. मुलाच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या मुलाला नोकरीचे आश्वासन दिले होते. ज्यामुळे त्याला आम्ही यांच्यासोबत पाठवले. पण यांनी आमचा विश्वास मोडला.

First published:

Tags: Shocking news, Top trending, Videos viral, Viral