बापरे! एक कप चहासाठी मोजावे लागतात 1 हजार रुपये; जाणून घ्या खासियत

चहा हा आपल्यासाठी सकाळचे पेय्य आहे. तर, स्ट्रेस (Stress), टेन्शन (Tension) किंवा सर्दी, पडसं यासारख्या त्रासातही चहा उपायकारक आहे. आयुर्वेदिक चहा रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि सर्दी पडसं बरं करण्यास उपयुक्त आहेत. चला जाणून घेऊया अशा सर्व आयुर्वेदिक चहांबद्दल.

कोलकाताच्या (Kolkata) मुकुंदपूरमध्ये एक असं टी स्टॉल आहे, जे देशातील कदाचित सर्वात महाग चहाचं दुकान असेल. या छोट्याशा स्टॉलमध्ये ग्राहकांसाठी 100 प्रकारचे वेगवेगळे चहा उपलब्ध आहेत

  • Share this:
    कोलकाता 21 जून: आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक चहाप्रेमी (Tea Lovers) पाहायला मिळतात. असे लोक नेहमी वेगवेगळ्या आणि खास चहाच्या शोधात असतात. मात्र, कधी तुम्ही असा विचार केला आहे का, की एक कप चहासाठी कोणी एक हजार रुपये खर्च करू शकतं? कदाचित तुमचं उत्तर नाही असंच असेल. मात्र, चहाप्रेमींसाठी आज आम्ही अशी एक जागा सांगत आहोत जिथे एक कप चहाची किंमत एक हजार रुपये आहे आणि ही जागा भारतातीलच आहे. कोलकाताच्या (Kolkata) मुकुंदपूरमध्ये एक असं टी स्टॉल आहे, जे देशातील कदाचित सर्वाच महाग चहाचं दुकान असेल. या छोट्याशा स्टॉलमध्ये ग्राहकांसाठी 100 प्रकारचे वेगवेगळे चहा उपलब्ध आहेत. इथे एक कप चहाची किंमत अगदी बारा रुपयांपासून सुरू होऊन हजार रुपये प्रति कप इतकीही आहे. आता तुमच्याही डोक्यात विचार आला असेल, की एक हजार रुपये किंमत असणाऱ्या या एक कप चहाची खासियत नेमकी काय आहे. या चहासाठी Bo-Lay नावाची चहापावडर वापरली जाते. या एक किलो चहापावडरची किंमत 3 लाख रुपये आहे. 11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला व्यक्ती जिवंत कसा झाला? CBI करणार तपास या दुकानात 100 प्रकारचा चहा मिळतो. मात्र, यातील काही खास चहाची नावं आहेत, लवेंडर टी, ओकेटी टी, वाईन टी, तुलसी जिंजर टी, हिबिस्कस टी, रूबियस टी, सिलव्हर टी आणि ब्लू टिश्यन टी. प्रत्येक प्रकारच्या चहाची काहीतरी वेगळी वैशिष्ट्ये आहेत. या दुकानात दुरुनही लोक चहा पिण्यासाठी येतात. राज्य सरकार 5 वर्ष चालणार?, संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया या दुकानाच्या मालकाचं नाव आहे, पार्थ प्रातिम गांगुली. त्यांनी 2014 मध्ये हे दुकान सुरू केलं. पार्थ सुरुवातीला नोकरी करायचे, मात्र नंतर त्यांनी नोकरी सोडली आणि आपलं आवडीचं काम म्हणजेच चहा विकण्याचं काम सुरू केलं. हळूहळू त्यांचा चहा आसपासच्या परिसरातही प्रसिद्ध झाला आणि आता त्यांचा चहा देशभरात प्रसिद्ध झाला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published: