मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सर्वात महागडा बटाटा, याची किंमत आणि काही रंजक गोष्टी तुम्हाला माहितीयत?

सर्वात महागडा बटाटा, याची किंमत आणि काही रंजक गोष्टी तुम्हाला माहितीयत?

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

हो, हे खरं आहे... जगात अशा प्रकारच्या बटाट्याची लागवड केली जाते, ज्याची एक किलोची किंमत 50 हजारांच्या जवळपास आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 4 डिसेंबर : बटाटा ही अशी भाजी आहे, ज्याला सगळ्याच भाज्यांमध्ये तुम्ही वापरु शकता. शिवाय याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनू शकतात. एवढंच काय तर याचा वापर इतर स्ट्रीट फुडमध्ये देखील केला जातो. ज्याची चव सगळ्यांनाच आवडते. म्हणून तर बटाट्याला भाज्यांचा राज म्हणतात. तसेच हा तुम्हाला घराघरात आढळेल.

बटाटा आपल्याला बाजारात साधारण 20 ते 70 रुपये किलोपर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळेच तो सर्वांनाच परवडणाऱ्या किंमतीत मिळतो. पण जर तुम्हाला सांगितलं की असा ही बटाटा आहे, ज्याची किंमत 40 हजार ते 50 हजार रुपये आहे.

हो, हे खरं आहे... जगात अशा प्रकारच्या बटाट्याची लागवड केली जाते, ज्याची एक किलोची किंमत 50 हजारांच्या जवळपास आहे.

हे ही वाचा : भाजीला काय सोनं लागलंय? भाजीची किंमत ऐकून तुम्हाला बसेल 440 वोल्टचा शॉक...

त्याची लागवड कुठे केली जाते?

ली बोनोट्टे (Le Bonnotte) असे या बटाट्याचे नाव आहे. या बटाट्याची लागवड फ्रांसच्या इले द नोइरम्युटियर (Ile de Noirmoutier) या बेटावर केली जाते.

वालुकामय जमिनीवर याची लागवड केली जाते. समुद्री शैवाळ त्याचे खत म्हणून काम करते. ५० चौरस मीटर जमिनीवरच याची लागवड केली जाते, असे सांगितले जाते.

जगातील पाच महागड्या भाज्यांच्या यादीत समावेश

बटाट्याच्या आढावा वेबसाइटनुसार, त्याची सरासरी किंमत प्रति किलो 500 युरो म्हणजेच सुमारे 44282 रुपये प्रति किलो आहे. जागतिक माध्यम कंपनी कॉंडे नॅस्ट ट्रॅव्हलने जगातील पाच महागड्या भाज्यांमध्ये याचा समावेश केला आहे.

सोर्स : गुगल

बटाट्याची सर्वात दुर्मिळ प्रजाती

हा बटाटा दुर्मिळ प्रजातींच्या श्रेणीत ठेवला जातो. ले बोनोट्टे दरवर्षी फक्त १० दिवसांसाठी उगवतात. त्याच्या लागवडीसाठी खूप काळजी घ्यावी लागते. ला बोनोटे बटाटा लागवडीनंतर तीन महिन्यांनी खोदून काढला जातो. फेब्रुवारीत त्याची पेरणी होते आणि मे महिन्यात उत्खनन केले जाते. हा बटाटा जमिनीतून काढण्यासाठी हलक्या हाताचा वापर करावा लागतो, अन्यथा तो खराब होऊ शकतो.

किंमत किती?

या बटाट्याची चव खारट असते. प्युरी, सॅलड, सूप आणि क्रीम तयार करण्यासाठी याचा वापर करता येतो. तसेच याचे सेवन अनेक आजारांवर फायदेशीर मानले जाते. ट्रेड इंडिया या ई-कॉमर्स वेबसाईटवर ली बोनोट्टेच्या 1 किलोची किंमत 690 डॉलर म्हणजेच 56,020 किलो आहे.

त्याचबरोबर गो फॉर वर्ल्ड बिझनेसवर त्याच्या ५०० ग्रॅम बटाट्याची किंमत ३०० डॉलर म्हणजे २४ हजार रुपये आहे.

First published:

Tags: Shocking, Social media, Top trending, Viral, Viral news